सचिन तेंडूलकर सह क्रिकेट मध्ये अनेक स्टार देणारे गुरु रमाकांत आचरेकर सरांचे काल निधन झाले. क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून त्यांना अनेक लोक ओळखतात. सरांचा स्वभाव हा अतिशय शिस्तप्रिय आणि याच स्वभावामुळे क्रिकेटला अनेक हिरे मिळाले. रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.
सचिन हा अतिशय खोडकर होता. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंदुलकर यांनी त्यांना रमाकांत सरांकडे क्रिकेटच्या कोचिंग करिता पाठविले. कोचिंगच्या सुरवातीच्या काळात सचिन हा अनुशाषणप्रिय नव्हता तो अतिशय खोडकर होता.
सचिनला शारदाश्रम शाळेत असल्यापासून आचरेकर सरांनी क्रिकेटचे धडे दिले. शारदाश्रम शाळा सुटली की सचिन काका-काकूंकडे जायचा. जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन खेळण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायचा. विशेष म्हणजे आचरेकर सरांचे क्रिकेटच्या मैदानावरचे सचिनच्या बालपणीचे किस्से प्रसिद्ध आहेत.
असाच एक किस्सा चांगलाच प्रसिद्ध आहे. तो किस्सा आहे स्टंपवर ठेवल्या जाणाऱ्या नाण्याचा. या एका नाण्याने सचिन तेंडुलकरला घडवण्यात मोठे योगदान दिले. सचिन फलंदाजीसाठी उतरल्यानंतर आचरेकर सर स्टम्पवर एक रुपयाचं नाणं ठेवायचे.
सचिन जर पूर्ण सेशन नॉट आऊट राहिला तर आचरेकर सर ते नाणं सचिन तेंडुलकरला द्यायचे. अन जर एखाद्या गोलंदाजाने सचिनला बाद केले तर ते नाणं त्या गोलंदाजाला मिळायचं. त्यामुळे सर्व गोलंदाज सचिनची विकेट घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. आचरेकर सरांच्या किश्श्यामुळेच सचिनचा क्रिकेट खेळण्याचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला.
सचिनने आचरेकर सरांकडून अशाप्रकारे १३ नाणे जमा केले होते. आरचरेक सरांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं होतं. शिवाय क्रीडा प्रशिक्षकांसाठी देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…