सोशल मिडीयावर आजकाल गोष्टी वाऱ्यासारख्या वायरल होतात. त्याचाचे एक नमुना आज आपण बघणार आहोत. निर्मला सीतारामन यांची मुलगी भारतीय सैन्यात आहे आणि त्या भारतातील एकमेव मंत्री असतील असा मथळा असणारा फोटो आजकाल भयंकर वायरल झालेला दिसत आहे. आज खासरेवर बघूया काय आहे या फोटो मागील सत्य
काही दिवसापासून हा फोटो शेअर होत आहे. परंतु अनेक लोक फोटो सत्य का खोटा या तपासण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे हि खटाटोप आम्ही आपल्या करीता करत आहोत. २७ डिसेम्बर २०१८ ला हा फोटो आय सपोर्ट मोदि नावाच्या पेज वरून वायरल करण्यात आला. त्या पेज वरून हा फोटो हजारो वेळेस शेअर करण्यात आलेला आहे.
या नंतर सोशल मिडीयावर शोध पत्रकारिता करणाऱ्या अनेक लोकांनी या फोटोचा शोध घेतला त्यांच्या समोर एक गोष्ट ध्यानात आली कि निर्मला सीतारामन यांची कन्या सैन्यात नाही. तर मग हि मुलगी कोण हा हि प्रश्न पडतो. हा फोटो वायरल झाल्यामुळे डिफेन्स मिनिस्ट्री ने tweet करून सांगितले आहे कि सदर फोटोत दिसणारी मुलगी हि त्यांची मुलगी नाही आहे.
काही वेबसाईटचा आधार घेतल्या नंतर आम्हाला कळले कि या मुलीचे नाव निकिता वर्रेया आहे आणि ती सैन्यात काम करते. खाली दिलेल्या फोटोत आपण तिचे फेसबुक अकाऊट बघू शकता.
या मुलीचे नाव निकिता असून निर्मला सीतारामन यांच्या मुलीचे नाव Parakala Vangmayi हे आहे. परंतु हा फोटो भाजपच्या अनेक पादाधीर्कार्याने शेअर केलेला आहे. आपल्याला पुढे हा फोटो दिसल्यास नक्की त्यांना हि कळवा आणि त्यांचा गैरसमज दूर करा. आणि ज्यांनी हा फोटो शेअर केला त्यांना डिलीट करावा कारण सोशल मिडीयावर खोटे पसरविणे हा गुन्हा आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.