सचिन तेंडूलकर सह क्रिकेट मध्ये अनेक स्टार देणारे गुरु रमाकांत आचरेकर सरांचे आज २ जानेवरीला निधन झाले. क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून त्यांना अनेक लोक ओळखतात. सरांचा स्वभाव हा अतिशय शिस्तप्रिय आणि याच स्वभावामुळे क्रिकेटला अनेक हिरे मिळाले. रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा मृत्यू ८७व्या वर्षी निधन झाले. सराने सचिनला दिलेल्या एका थापडी मुळे तो कसा बदलला आज खासरे वर बघूया
आज क्रिकेट जगतात किंवा इतर सर्व ठिकाणी सचिन धीर गंभीर दिसतो परंतु लहानपणी याच्या उलट सर्व काही होते. सचिन हा अतिशय खोडकर होता. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंदुलकर यांनी त्यांना रमाकांत सरांकडे क्रिकेटच्या कोचिंग करिता पाठविले. कोचिंगच्या सुरवातीच्या काळात सचिन हा अनुशाषणप्रिय नव्हता तो अतिशय खोडकर होता.
२०१७ साली सचिन ने हा किस्सा tweet करून सर्वाना सांगितला होता कि, हि गोष्ट सचिनच्या शाळेतील आहे. तो ज्युनियर टीम करिता खेळत होता आणि वानखेडे स्टेडियमला सिनियर टीम हैरिस शील्डचे फायनल खेळत होते. त्या दिवशी सरांनी सचिन करिता एक सराव सामना ठेवला होता आणि कॅप्टनला त्यांनी सांगितले होते कि सचिनला ४ नंबर ला खेळायला देणे. परंतु तो सामना सोडून वानखेडे स्टेडियमला सामना बघयला गेला. तो तिथे शाळेच्या सिनियर टीमला चीयर करायला गेला. सामना संपताच सचिनला आचरेकर सर दिसले.
सचिन आचरेकर सरा कडे गेला आणि त्यांनी त्याला विचारले ” आज किती रन बनविले” तो बोलला ” सर आज मी खेळलो नाही. मी सिनियर टीमला चीयर करायला आलो” आणि हे ऐकताच सचिनला आचरेकर सरांनी एक थापड बजावली. आणि त्याला सांगितले कि ” स्वतः काहीतरी हो, कि लोक तुझ्या साठी टाळ्या वाजवतील. लोकाकरिता तू टाळ्या नको वाजवू”
हि गोष्ट सचिनच्या नेहमी करिता लक्षात राहिली आणि त्या दिवसानंतर आपल्या सरावाकडे सचिन गांभीर्याने लक्ष देऊ लागला. आणि त्याचा परिणाम आज सर्वासमोर आहे. आरचरेक सरांना पद्मश्रीने गौरवण्यात आलं होतं. शिवाय क्रीडा प्रशिक्षकांसाठी देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता.
आचरेकरांनी फक्त या दोन खेळाडू तेंदुलकर व विनोद कांबळी घडवले असे नाही तर भारतीय क्रिकेट संघातील अनेक माजी खेळाडूंचे ते द्रोणाचार्य आहेत. आचरेकरांनी अनेक नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज भारतीय संघाला दिले. खासरे परिवारा तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..