श्रीमंत व्यक्तींच्या मुलींच्या किंवा मुलांच्या लग्नात मोठा थाटमाट असतो. शेवटी ते श्रीमंतांचे मुलं असतात. कोट्यवधी रुपये खर्चून हे विवाहसोहळे पार पडतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानींच्या मुलीचे लग्न झाले. या लग्नासाठी तब्बल ७१० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
पण अशी देखील परिस्थिती आहे कि गरिब शेतकरी मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे नसतात म्हणून आत्महत्या करतात. तर काही मुलींनी देखील आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडल्या आहेत.
शेवटी शेतकऱ्यांच्या सुद्धा काही मुलींसाठी अपेक्षा असतात. मुलीचे लग्न धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करत लग्न धुमधडाक्यात लावले आहे. या लग्नात आगळावेगळा थाट बघायला मिळाला.
दौंड तालुक्यातल्या केडगाव येथील शहाजी देशमुख या शेतकर्याने आपल्या कोमल या मुलीची लग्नात बुलेटवर मंडपात जाण्याची इच्छा होती. या शेतकरी बापाने मुलीला घरापासून विवाहस्थळापर्यंत बुलेटवर आणत तिची हि० हौस पूर्ण केली. एकीकडे मुलीला दुय्यम वागणूक देण्यात येण्याच्या बऱ्याच घटना घडतायत तर शहाजी देशमुख यांनी मुलगी देखील तेवढीच लाडाची आणि महत्वाची असल्याचे दाखवून दिले आहे.
दौंड तालुक्यातल्या केडगाव इथल्या आर्यन लॉन्स मंगल कार्यालयात येथील शेतकरी शहाजी देशमुख यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता. सकाळपासून नातेवाईक, मित्र परिवार, पाहुणेरावळे लग्नासाठी जमा झाले होते. नवरदेव, नववधू येण्याची अनेकजण वाट पाहत होते.
एरवी कोणत्याही लग्नात साधारणपणे नववधू चारचाकीतून येताना पाहायला मिळतं. मात्र या लग्नात नववधू कोमल ही स्वत: बुलेटवरुन आलेली पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. दुचाकी, चारचाकी चालवणार्या मुली पाहिल्या असल्या तरी चक्क स्वत:च्या लग्नात नववधूने बुलेटवरुन येणं हे सर्वांसाठी सुखद धक्का देणारं होतं.
शहाजी देशमुख यांची मुलगी नववधू कोमल हिने आपल्या लग्नात बुलेटवरुन येण्याची इच्छा होती. त्यानुसार सकाळी नववधू कोमल आपल्या घरापासून विवाह स्थळापर्यंत स्वत: बुलेट चालवत दाखल झाली.
मुलगी जन्मली की समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा घडतात. अनेक मुलीला दुषणे दिली जातात. मात्र केडगावच्या देशमुख कुटुंबीयांनी मात्र मुलीची हौस पूर्ण करत एक वेगळा संदेश दिलाय. त्याचवेळी नववधू कोमलची बुलेटवरुन झालेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…