सनी वाघचौरे हा पिंपरी चिंचवड पुणे येथील उद्योजक एकदम शाही आयुष्य जगत असतो. सनी वाघचौरेचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सनीचा गोल्डन ऑडी,गोल्डन बूट अंगावर गोल्ड असा नेहमीचा पेहराव असतो.
सानी हा एक बांधकाम व्यावसायिक असून सोबतच तो फिल्म फायनान्सर म्हणून देखील काम करतो. जिला गाझियाबाद, जयंतीभाई कि लव स्टोरी सारख्या मोठ्या हिंदी सिनेमाला सनीने फायनांस केलेले आहे. सिनेस्टार विवेक ओबेराय सोबत कर्मा इंटरप्रायजेस मध्ये तो पार्टनर आहे.
सनीला महागड्या मोबाईलची आवड आहे. VERTU हा मोबाईल उच्चभ्रू ग्राहकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बनविल्या जातो. मोबाईलची विशेषतः हि कि हा मोबाईल हाताने असेम्बल केला जातो. यामध्ये महागाचे हिरे,खडे वापरण्यात येतात. या मोबाईलची कमीतकमी किंमत ६ लाख ५० हजार पासून सुरु होते. सनीकडे या कंपनीचे मोबाईल आहेत.
तसेच सनी हा महागड्या गाड्याच्या शौकीन आहे. त्याची मर्सडिज हि गाडी तर संपूर्ण सोन्याने मढवलेली आहे. सनी वाघचौरेचा आज वाढदिवस आहे. नववर्ष आणि वाढदिवसाच्या मुहूर्तावर सनीने काही नवीन गोष्टी आपल्या कलेक्शन मध्ये ऍड केल्या आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बघा व्हीडिओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…