नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. २०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला देखील सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मोट बांधायला सुरुवात केली आहे.
युतीचं अजून नाही होय चालू असताना आणि आघाडीत मात्र महाराष्ट्रात जागावाटपाच्या चर्चा सध्या सुरु आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाटेत अनेकांच्या नौका बुडाल्या होत्या. यावेळी मात्र सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सर्वत्र कांटे कि टक्कर होणार असे चित्र आहे.
राष्ट्रवादीने आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक पाऊल पुढे टाकत परभणी लोकसभा मतदारसंघात एक नवीन जाहिरात केली आहे. हि जाहिरात चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
परभणी जिल्ह्यात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश मिळत आहे. पण यावेळी विजय मिळवण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी लोकसभेच्या प्रचारासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
बाबाजानी दुर्राणी यांनी वृत्तपत्रात नववर्षाच्या शुभेच्छांची जाहिरात केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मतदारांना खासदार बदलण्याचे आवाहन केले आहे. ‘खासदार बदला, जिल्हा बदलेल… वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची’ या मथळ्याखाली ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.शिवसेनेने आजपर्यंत केवळ जातीय तेढच निर्माण केल्याचा आरोप त्यांनी या जाहिरातीमधून केला आहे.
नेहमीच शिवसेनेचा खासदार निवडून येत असल्याने जिल्ह्याचा विकास रखडला असल्याचे त्यांनी यातून म्हंटले आहे. ही जाहिरात परभणीकरांमध्ये मात्र चर्चेचा विषय बनली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…