मागच्या आठवड्यात रणवीर सिंगचा सिंबा हा बहुप्रतीक्षित सिनेमा रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सिंबा तुफान चालत आहे. सिंबाने पहिल्या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सिंबा हा रणवीर सिंगचा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला सिनेमा ठरला आहे.
शुक्रवारी सिनेमा रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसातच सिनेमाने ४४ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर रविवारी सिनेमानं ३१.०६ कोटी कमाई केलीय. सिंबाची भारतातच नव्हे तर परदेशातही धूम आहे. भारतात सिनेमाने आतापर्यंत ७५ कोटींचा गल्ला जमवला आहे तर परदेशातहा दोन दिवसात २४.२२ कोटींचा गल्ला जमवला आहे.
प्रेक्षक सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी करतायत म्हंटल्यावर सिंबाची टीम कशी मागे राहणार. सिंबाचा प्रतिसाद पाहायला थिएटरमध्ये चक्क रणवीर सिंग रोहित शेट्टसोबत पोचला.
रणवीर आणि रोहित थिएटर मध्ये आल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये थिएटरमध्ये रणवीरला पाहिल्यावर सगळ्यांनीच त्याच्या भोवती गर्दी केली आहे. त्यात एक स्त्री पुढे येऊन रणवीरला म्हणाली, माझा पाय फ्रॅक्चर झालाय, तरीही मी सिंबा पाहायला आले. त्यावर रणवीरनं त्या महिलेच्या गालावर किस केला. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.
रणवीर सिंगच्या वागण्याने त्या महिलेला देखील प्रचंड आनंद झाला. पाय फ्रॅक्चर असतानाही सिनेमा बघायला आलेल्या या महिलेचा आनंद यामुळे द्विगुणित झाला असेल.
सिंबा सिनेमात ११ मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. रणवीर आणि दीपिकाचं नुकतंच लग्न झाला आहे. त्यांने आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ सिंबाच्या प्रमोशनसाठी दिला आहे. परवा तो दीपिकासोबत हनिमूनला रवाना झाला.
हनिमूनला जाण्यापूर्वी दीपिकाने सिंबाच्या टीमसोबत सिनेमा पाहिला. तिने रोहित शेट्टी आणि रणवीरचे सिनेमा पाहिल्यानंतर अभिनंदन आणि कौतुक केले. रणवीरने बायकोला माझा अभिमान वाटल्याची माहिती मीडियाला दिली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…