सोशल मीडियावर नेहमीच अनेक गोष्टी खूप व्हायरल होत असतात. कालच २०१८ वर्षाला निरोप देण्यात आला. २०१८ मध्ये अनेक व्हिडीओनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांच्या माध्यमातून खूप कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे शक्य होते. मागील वर्षभरात इंटरनेटवर अनेकजण रातोरात स्टार बनले.
यामध्ये खासकरून अभिनेत्री प्रिया वॉरीयर, डान्सिंग अंकल, वहिलीचा लग्नातील डान्स, न्यूजरुममध्ये आपल्या को अँकरशी भांडणारी महिला अँकर, रँप वॉकवर आलेली कॅटचे व्हिडीओ जास्त गाजले.
खासरेवर बघूया २०१८ मध्ये सर्वात जास्त वेळा बघितलेले हे २ व्हिडीओ-
१. प्रिया वारियर
२०१८ या वर्षभरात गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्रियाचं नाव अग्रस्थानी आहे. एका दिवसात इन्स्टाग्रामवर तिने सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले. मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील ‘माणिक्य मलरया पूवी’ या चित्रपटातील एका गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे.
प्रियाने केवळ भुवया उंचावत आणि नजरेचे बाण चालवत संपूर्ण देशभरातील अनेकांचीच मनं जिंकली. तिच्या एका व्हिडीओने ती रातोरात सुपरस्टार बनली होती.
२. डान्सिंग अंकल
डान्सिंग अंकल म्हणून प्रसिद्ध असणारे संजीव श्रीवास्तव हे ४६ वर्षांचे आहेत. ते मध्यप्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करतात. मिथुन आणि गोविंदा हे आपले डान्समधील आयडॉल असल्याचे डान्सिंग अंकल नेहमीच सांगतात.
आपल्या या डान्सिंगमुळे श्रीवास्तव विदिशा महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले गेले आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…