८० ते ९०च्या दशकात सिनेमा म्हटला तर तो कादर खान यांच्या शिवाय अपूर्ण होता. कुठल्या हि प्रकारचा द्विअर्थी जोक न करता कादर खान आपल्या अभिनयाने हास्याचे फवारे उडवत असे. आज त्यांचे कॅनडा येथे उपचारा दरम्यान निधन झाले. तर आज खासरेवर बघूया कादर खान यांच्या विषयी काही अपरिचित माहिती,
कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोंबर १९३७ रोजी काबुल अफगाणिस्तान मध्ये झाला. कादर खान यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते त्यांनी जवळपास १००० पेक्षा अधिक सिनेमा करिता लिखाण केलेले आहे. आपल्याला कादर खान फक्त त्यांच्या कॉमेडी मुळे आठवण आहेत परंतु त्या पलीकडे त्यांचे कार्य आहे. जवळपास ३०० सिनेमात त्यांनी काम केलेले आहे. संवाद, दिग्दर्शक असे इत्यादी काम त्यांनी केलेले आहे.
गोविंदाचा सिनेमा असल्यास कादर खान त्या सिनेमात हवे म्हणजे हवे असे काही समीकरण त्या काळात झाले होते. या दोघांना बघयला प्रेक्षकांची झुंबड उडायची. “अंदाज अपना अपना” सलमान व आमीरचा सुपर हिट चित्रपटाचा सिक्वेल करिता सध्या त्यांचे लिखाण सुरु होते असे अनेक लोक सांगतात. American Federation Of Muslims Of India यांच्या तर्फे त्यांच्या समाजसेवे करिता त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता.
कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने अनेक सिनेमात अभिनय केले परंतु त्याला वडिलाप्रमाणे प्रसिद्धी मिळाली नाही. तेरे नाम, रमय्या वस्तावयया या हिंदी सिनेमात सरफराजने काम केलेले आहे.
अभिनयात येण्या अगोदर कादर खान यांनी M.H. Saboo Siddik College of Engineering, Mumbai येथे स्थापत्य अभियंताची पदवी पूर्ण केलेली आहे. प्राध्यापक असताना त्यांनी एका नाटकात काम केले ते नाटक दिलीप कुमार यांनी बघितले व त्यांना त्यांच्या सिनेमात सह कलाकार म्हणून रोल दिला. अरबी भाषेत त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे. त्यांचे स्वप्न होते कि अरबी भाषाचे विद्यापीठ पाकिस्तान, भारत व कॅनडा येथे सुरु करावे.
१९७३ साली आलेला डाग हा सिनेमा त्यांचा पहिला सिनेमा होता व त्यांचा शेवटचा सिनेमा हा “मुझसे शादी करोगी” सलमान व अक्षय कुमार यांच्या सोबत होता. कादर खान यांना खासरे परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..