बॉलिवूड अभिनेते कादर खान यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपूर्वी कादर खान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना कॅनडामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली. दीर्घकाळापासून सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या कादर खान यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूडला ही दु:खद बातमी मिळालीय.
१९७३ मध्ये अभिनयाची सुरुवात केलेल्या कादर खान यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केलं होतं. अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्यापूर्वी कादर खान यांनी एम.एच. साबू सिद्दीक महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी देखील केली.
कादर खान यांचे ‘ते’ स्वप्न राहिले अधुरे-
अमिताभ यांच्यासोबत कादर खान यांना एक चित्रपट बनवायचा होता, पण नियतीला कदाचित वेगळेच काही मान्य होते.अमिताभ आणि कादर खान यांनी दो और दो पांच, मुकद्दर का सिकंदर , मिस्टर नटवरलाल , सुहाग, कुली, शहंशाह या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
अमिताभ यांच्या अमर अकबर अँथनी , सत्ते पे सत्ता , मिस्टर नटवरलाल आणि शराबी या चित्रपटांचे डायलॉगही त्यांनी लिहिले. पण इतके पुरेसे नव्हते. कादर खान यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट बनवायचा होता.
एका मुलाखतीत खुद्द कादर खान यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. अमिताभ बच्चन, जया प्रदा आणि अमरीश पुरी यांना घेऊन मला जाहिल हा चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मला करायचे होते, असे कादर खान या मुलाखतीत सांगितले होते.
बरे झाल्यानंतर ते इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी झाले आणि राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे कादर खान यांचे अमिताभ बच्चनसोबत चित्रपट करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…