जग हे आधुनिक झाले आहेत. सगळीकडे निव्वळ धुमाकूळ आहे स्मार्टफोनचा आता तर जिओ मुळे खेड्या पाड्यात सुध्दा 4G मोबाइल पोहचले आहे. परंतु या स्मार्ट जगात आपल्यावर गुगल लक्ष ठेवून आहे हे तुम्हाला सांगितले तर नवल वाटणार ना ? आज खासरे बघा गुगल कसे दाखवतो तुम्ही कुठे केला आहे वर्षभर प्रवास…
सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत ज्यामध्ये विविध अप्लिकेशन आपण वापरतो उदाहरणार्थ whatsapp, facebook इत्यादी. एखाद्या वेळी मोठ्या शहरात गेल्यावर आपल्याला हक्काच्या ठिकाणी पोहचवणारे अप्लिकेशन गुगल मॅप्स हे आहे. अनोळखी शहरात या अप्लिकेशनमुळे कोणालाही पत्ता विचाराची गरज पडत नाही. परंतु हे अप्लिकेशन तुमच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे जरा सावधान कारण तुमची प्रायवसि धोक्यात येत आहे. फेसबुकसुध्दा असेच करतो आपण कुठे गेल्यावर चेकइन नावाचे ऑप्शन येते त्यामुळे तुम्ही सध्या कुठे आहेत हे सर्वाना कळवता. त्यासोबतच गुगल आणि फेसबुक तुम्हाला आता या ठिकाणी कोणत्या सुविधा आहे या विषयी पण माहिती विचारत आहे. यासर्व माहिती इतर कंपन्याना फेसबुक अथवा गुगल विकतात असे सांगण्यात येते.
आज आपण खासरे बघणार आहोत कि गुगल तुम्ही वर्षभर कुठे कुठे प्रवास केला याविषयी माहिती जमा ठेवते. विश्वास बसत नाही ना ? आणि विशेष हे आहे कि तुम्ही सेटिंग बदलली तरीसुध्दा गुगल तुम्हाला न माहित होता हि माहिती जमा करतो. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बघा तुम्ही कुठे कुठे प्रवास केला आहे. गुगल तुम्हाला माहिती न होता हि माहिती मिळवतच राहणार आणि आत्तापर्यंत तुम्ही या पासून अज्ञात होता.
इथे क्लिक करा For Maps Click Here
फोनवरून तुम्ही क्लिक करत असाल तर लिंक ब्राउसरमध्ये उघडेल तुमचे गुगलचे खाते लॉगीन करा आणि बघा जादू तुम्ही जिथे जिथे गेला त्या ठिकाणी लाल ठिपके येतील. एकूण तुम्ही किती ठिकाणांना भेटी दिल्या आहेत त्याचा आकडा हि कळेल. कम्प्युटरवरहि सेम प्रोसेस आहे वर दिलेल्या ठिकाणी क्लिक करा आणि गुगल खाते लॉगीन केले कि तुमचे ठिकाण कळेल.
एवढेच काय मित्राचे अथवा मैत्रिणीचे गुगल खाते आपल्या फोन अथवा लॅपटॉपवर लॉगीन केले कि त्यांनी केलेला प्रवास सुद्धा तुम्हाला माहिती पडेल. तुमचे गांव मोठं असेल आणि तुम्ही गावातच बँकेत, मंदिरात आणि कुठं गेला असाल, तर त्याचेही वेगळे लाल ठिपके दिसतील. बर्याच लोकांचं म्हणणं आहे की ते वर्षभरापूर्वी एखाद्या गावाला गेले असतील, तर ते ही त्यांना या लिंकवर दिसलंय.
परंतु आपल्या प्रायवसीचे काय ? हा मोठा प्रश्न आहे आधुनिक जगात आपले खाजगी आयुष्य सार्वजनिक होत आहे याचा नक्की विचार करावा प्रत्येकाने जर तुम्हाला तुमची लोकेशन द्याची नसेल तर गुगल मॅप्सच्या ऍपमध्ये लोकेशन हिस्टरी बंद ठेवता येईल. परंतु यामुळे गुगलकडे असलेली तुमची माहिती जाणार नाही फक्त यापुढे कमी माहिती मिळेल. करा ट्राय सर्व मित्र मैत्रिणीबरोबर तुम्ही या वर्षी कुठे कुठे प्रवास केला मिळवा नकाशा आणि कमेंट मध्ये सांगा आम्हाला कसा झाला प्रवास आणि कसा वाटला लेख.. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका… परत एकवेळ लिंक देत आहो क्लिक करा इथे Click Here
I like mala sarv kahi disale