इंटरनेट अशे मध्यम आहे जे रातोरात कोणालाही स्टार बनवू शकतात. असच काही झाल काल प्रिया वारियरचा एक विडीओ सध्या सोशल मिडीयावर आला आणि प्रिया रातोरात सर्व मुलाच्या काळजाचे ठोके चुकवत आहे. आज खासरेवर असेच काही चेहरे बघूया जे रातोरात सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आणि सध्या स्टार म्हणून सर्वत्र वावरत आहेत.
कमलेश
कमलेशचा विडीओ हा मुळात दिल्ली येथील येथील एका माहितीपटातील होती. नशेच्या आहारी गेलेल्या दिल्ली येथील लोकाची वास्तविकता दाखविण्याकरिता “नशेबाझ” हा माहितीपट बनविण्यात आला होता त्यामध्ये कमलेश दिसला होता. हा विडीओ काही वर्षा अगोदर शूट करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मिडीयावर फार कमी लोक असे असतील ज्यांना कमलेश माहिती नाही.
शिल्पा ठाकरे
व्हाट्सएप, फेसबुक आणि युट्युबवर धुमाकूळ घातलेल्या या एक्सप्रेशन क्वीनचं नाव आहे शिल्पा ठाकरे आणि ती आहे एक मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री. होय शिल्पा ठाकरे एक ही मराठी नवोदित अभिनेत्री आहे. शिल्पाचा जन्म नागपूर या शहरात झालेला आहे. शिल्पाही अभिनयाबरोरब एक चांगली लेखिका व डान्सर आहे. शिल्पा ठाकरे सध्या पुण्यात राहते. शिल्पाचे शालेय शिक्षण एमकेवी स्कुल नागपूर येथे झालेले आहे.
शिल्पा लवकरच प्रेमा या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पाने सुम्मी या चित्रपटासाठी डायलॉग आणि कथानक लिहिलं आहे. प्रेमा या चित्रपटात शिल्पा आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पा व्यतिरिक्त मानसी नाईक ही आपल्याला दिसणार आहे.
नगरपालिका वाला मुलगा शहीद अल्वी
शहीद अल्वी हा युट्युब चैनेल चालविणारा सामान्य मुलगा एका विडीओ मध्ये तो देशातील चुका दाखविताना खाली पडतो आणि देश सोडून स्थानिक प्रशासनाला शिव्या देतो बस हा युट्युब विडीओ भयंकर गाजला आणि शाहीदचे मिम संपूर्ण सोशल मिडीयावर फिरू लागले. शहीद अल्वी आता सोशल मिडीयावर स्टार असून त्याचा युट्युब चैनेलला लाखो subscriber झाले आहेत.
प्रिया वारियर
या गाण्यात दिसणारी ही मुलगी एखादी साधीसुधी मुलगी नाहीये तर ती आहे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरीअर. प्रिया ही एक अभिनेत्री असून ती मल्याळम सिनेमा ‘ओरु आदर लव्ह’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ओमर लुलू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. याच सिनेमातील एक गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. या गाण्याने थोड्याच कालावधीत इंटरनेटवर लाखो हिट्स मिळवले आहेत.
‘माणिक्य मलाराया पूवी’ या गाण्याने एक दिवसातच प्रिया ला प्रसिद्धीझोतात आणले आहे. या गाण्यामध्ये प्रिया हायस्कूल मधील क्रश दाखवण्यात आली आहे. PMA जब्बार यांचे शब्द असलेलं हे गाणं शान रहमान यांनी कंपोज केले आहे तर विनीत श्रीनिवासन यांनी हे गाणं गायले आहे. शान रहमानने हे गाणं पोस्ट केल्यानंतर इंटरनेटवर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रियाचा हा पहिला सिनेमा 03 मार्च 2018 ला रिलीज होणार आहे.
धींचाक पूजा
धींचाक पूजा म्हणून तुम्ही हिला ओळखता परंतु तिचे खरे नाव आहे पूजा जैन. सेल्फी मैने ले ली आज हे बेसूर गाणे सोशल मिडीयावर हिट झाले आणि पूजा स्टार झाली त्यानंतर तिने अनेक चैनेल आणले. बिग बॉसमध्येही तिने सहभाग नोंदविला होता. सर्वात जास्त युट्युबवर तिचा विडीओ त्या काळात बघितल्या गेला. पूजा दिल्ली येथे राहत असून सध्या ती स्टार आहे.
सोशल मिडिया सध्याच्या प्रसिद्धी माध्यमांना फाटा देऊन त्यांचे नविन स्टार निवडत आहे. अजून भविष्यात असे अनेक स्टार तुम्हाला पाहायला मिळतील याबाबत शंका नाही..
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.