सातवा वेटन आयोग लागू झालेल्या एका प्राथमिक शिक्षकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांसाठी पत्र लिहिले आहे. मागील दोन दिवसापासून हे पत्र सोशल मिडीयीवर राज्यभर व्हायरल झाले असून शिक्षक, कर्मचाऱ्यात याची चर्चा सुरु झाली आहे. अनेक जण सोशल मीडियावरून या शिक्षकाचे कौतुक करत आहेत.
खैरनार यांना पत्र वाचून राज्यभरातून फोन येत असून त्यांच्या भूमिकेचे अनेक शेतकरी, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. नगर जिल्ह्यातील समनापुर (ता. संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळेत किरण खरैनार हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते या भागातील आदर्श शिक्षक आहेत.
बघूया काय आहे या शिक्षकाने लिहिलेल्या पत्रात-
“”मी एक शेतकरी कुटूंबातील आहेत. वीस वर्षाच्या नोकरीच्या काळात दोन वेतन आयोग मिळालेत. त्यातून मिळणाऱ्या पैशात सर्व गरजा भागवून पगार उरतो. मात्र सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मला बैचेन करुन टाकत आहेत.
त्यामुळे मला सातवा वेतन आयोग नको, पण शेतकऱ्यांचे बघा. राज्यातील इतर बाबीवर खर्च करताना प्रथम प्राधान्याने शेतकरी कर्जमुक्ती, शेतमालाला दर मिळावा, दुष्काळी मदत देण्याला प्राधान्य द्यावे. एकवेळ वेतन आयोग नाही मिळाला किंवा उशिरा मिळाला तरी चालेल, मात्र रक्ताचे थेंब आश्रुत मिसळून जगण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना जगवलं पाहिजे.”
“राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. अनेक भागात लोकांना जगण्याची चिंता निर्माण झाली आहे. ज्या कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या श्रमातून महाराष्ट्र उभा राहिला आहे. त्यांना आधार देणं हे प्रत्येकांच काम आहे. शेतकरी जगला, तरच समाज जगेल.
त्याच भावनेतून मी “सातवा वेतन आयोग देण्याआधी शेतकऱ्यांकडे पाहण्याबाबत’ विनंती करणारे पत्र दिले आहे. हे माझे वैयक्तिक आहे. वेतन आयोग मिळावा. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांना आधार मिळणं फार गरजेचे आहे.”
– किरण खैरनार, प्राथमिक शिक्षक, समनापुर, ता. संगमनेर जि. नगर