एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर हा सिनेमा मनमोहन सिंघ यांच्या आयुष्यावर बनविण्यात आला आहे. अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका करणार आहेत. ट्रेलर मध्ये मनमोहन सिंग यांच्या या सिनेमात सोनिया गांधी यांना विलन दाखविण्यात आले आहे. अनु करार आणि काश्मीर प्रश्न इत्यादी विषय या ट्रेलर मध्ये दाखविण्यात आले आहे. या सिनेमात सोनिया गांधी यांची भूमिका जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर्ट या करणार आहेत.
अनुपम खेर यांची विचारधारा अनेकांना माहिती आहे त्यामुळे हा सिनेमा कसा असेल हे बघयला अनेकांना उस्तुकता आहे. विजय रत्नाकर गुट्टे यांनी हा सिनेमा बनविला आहे. अक्षय खन्ना देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाची शुटींग लंडन आणि भारतातील विविध भागात झालेली आहे.
मनमोहन सिंघ यांचे मिडिया सल्लागार संजय बारू यांच्या वादग्रस्त पुस्तक ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग एंड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह’ हा सिनेमा आधारित आहे. आपल्याला हा ट्रेलर आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.