पोस्टाने आपण कधी काही पाठवत असू किंवा आपल्याला काही येत असेल तर त्यासाठी पिन कोड हा खूप महत्वाचा असतो. जुन्या काळात सारख्याच नावाच्या गावांमुळे पत्र पाठवण्यासाठी मोठ्या अडचणी यायच्या. पत्र वेळेत नाही पोहचायचे, तर कधी कधी पत्र पोहचण्यासाठी वर्षे वर्ष लागायचे. पोस्ट विभागाला सुद्धा यामुळे मोठी अडचण व्हायची. ज्याला पत्र पाठवणार आहोत त्याला व्यवस्थितरित्या मिळावे यासाठी PIN Code ची व्यवस्था निर्माण करण्यात आली.
जुन्या काळात लोकं एकमेकांशी पत्रांच्या आधारे संपर्क साधायचे. पण ते ज्याला पाठवायचो त्याला व्यवस्थित पोहचेल का नाही याची खात्री नसायची. या समस्येवर उपाय म्हणून प्रत्येक राज्याला एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला. तोच कोड पिन कोड नावाने ओळखला जातो. जगातील कोणत्याही कोपऱ्यात कोणलाही पत्र किंवा सामान पाठवायचे असेल तर ते याच पिन कोडच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पाठवता येते.
जाणून घेऊया पिन कोडच्या 6 आकड्यांचा अर्थ-
पिन कोड मधील पहिला अंक हा देशातील क्षेत्राविषयी दर्शवतो. या अंकावरून कळते कि पिन कोड कुठल्या क्षेत्राचा आहे. उत्तरेतील राज्यांचा नंबर 1 आणि 2 असतो, पश्चिमेतील राज्यांचा 3 आणि 4, दक्षिणेतील राज्यांचा नंबर 5 आणि 6, पूर्वेतील राज्यांचा नंबर 7 आणि 8 तर सैन्याच्या डाक सेवेसाठी 9 नंबर असतो. पिन कोडचा दुसरा अंक हा उप क्षेत्राची माहिती दाखवतो.
तर पिन कोडच्या एकूण 6 अंकांपैकी सुरूवातपासूनचा तिसरा अंक जिल्ह्यासाठी असतो तर शेवटचे तीन अंक पोस्ट ऑफिससाठी असतात.
या राज्यांसाठी दिले आहेत पिन कोड
दिल्ली-11, हरियाणा – 12 आणि 13,
पंजाब – 14 से 16 पर्यंत, हिमाचल प्रदेश – 17, जम्मू-कश्मीर – 18 ते 19 पर्यंत
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड – 20 ते 28 पर्यंत, राजस्थान – 30 ते 34 पर्यंत
गुजरात – 36 ते 39 पर्यंत, महाराष्ट्र – 40 ते 44 पर्यंत, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड – 45 ते 49 पर्यंत
आंध्र प्रदेश आणि तेलंगाना – 50 ते 53 पर्यंत, कर्नाटक – 56 ते 59 पर्यंत, तमिळनाडु – 60 ते 64 पर्यंत
केरळ – 67 ते 69 पर्यंत, पश्चिम बंगाल – 70 ते 74 पर्यंत, ओडिसा – 75 ते 77 पर्यंत, आसाम – 78
पूर्वोत्तर – 79, बिहार आणि झारखंड – 80 ते 85 पर्यंत
तर भारतीय सेना डाक सेवेसाठी (एपीएस) 90 ते 99 पर्यंत कोड वापरण्यात येतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…