माणसांना जसं ओळख म्हणून आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र असते. त्याचप्रकारे राज्य, शहरं आणि गावांना ओळखण्यासाठी सुद्धा एक विशेष ओळख आहे. देशांची ओळख जशी कंट्री कोडने होते त्याचप्रकारे प्रत्येक देश, राज्य आणि शहराच्या ओळखीसाठी पिन (PIN)कोड वापरला जातो.
खासरेवर बघूया PIN Code चा इतिहास-
जगात अनेक देश, राज्य, जिल्हे, शहरे आणि खेडे आहेत. पण त्या सर्वांचे नावं लक्षात ठेवणे आणि त्यांच्याविषयी माहिती ठेवणे कठीण काम आहे. यासाठी प्रत्येक देश, राज्य, शहरांसाठी काही विशिष्ट कोड्स आणि नंबर्स असतात.
PIN कोड म्हणजेच Postal Index Number. 6 डिजिटच्या या नंबरवरून राज्याची, शहराची ओळख होते.जुन्या काळात लोकं एकमेकांशी पत्रांच्या आधारे संपर्क साधायचे. पण ते ज्याला पाठवायचो त्याला व्यवस्थित पोहचेल का नाही याची खात्री नसायची. त्यामुळे ज्याला पत्र पाठवणार आहोत त्याला व्यवस्थितरित्या मिळावे यासाठी PIN Code ची व्यवस्था निर्माण करण्यात आली.
जगातील कोणत्याही कोपऱ्यात कोणलाही पत्र किंवा सामान पाठवायचे असेल तर ते याच पिन कोडच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पाठवता येते.
भारतात कधी आणि कशी झाली PIN Code ची सुरूवात ?
पिन कोड हि केंद्रीय संचार मंत्रालयाचे पूर्व अतिरिक्त सचिव श्रीराम भिकाजी वेलांकर यांची देण आहे. 15 ऑगस्ट 1972 रोजी भारतात पिन कोडची सुरूवात झाली होती. PIN Code देशाच्या 9 विभागात विभागला गेला आहे. यामध्ये सेनेसाठी वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे.
जुन्या काळात सारख्याच नावाच्या गावांमुळे पत्र पाठवण्यासाठी मोठ्या अडचणी यायच्या. पत्र वेळेत नाही पोहचायचे, तर कधी कधी पत्र पोहचण्यासाठी वर्षे वर्ष लागायचे. पोस्ट विभागाला सुद्धा यामुळे मोठी अडचण व्हायची. या समस्येवर उपाय म्हणून प्रत्येक राज्याला एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला. तोच कोड पिन कोड नावाने ओळखला जातो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…