अनेकजण पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन करतात. पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार असल्याने प्रत्येक व्यक्तीला मोठी उत्सुकता आणि आनंद असतो. पण या आनंदात काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण आपण बऱ्याच आपल्या अधिकारांपासून अज्ञात असतो. अनेकजण नेहमीच विमानाने प्रवास करतात. त्यांना सुद्धा या गोष्टी माहिती नसतात. आज खासरेवर जाणून घेऊया विमानाने प्रवास करताना आपल्याला असलेल्या अधिकारांविषयी..
अनेकदा विमान प्रवास करताना विमान कंपन्यांकडून निष्काळजीपणा होतो. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.अशावेळी या नियमांची तुम्हाला मदत होऊ शकते.
भारतीय एअरलाईन्सने प्रवास करताना आपले तिकीट कन्फर्म असेल आणि ते आपल्याला प्रवासाच्या १ तास अगोदर रद्द करायचे असेल तर अशावेळी आपले २०० रुपये फक्त चार्ज होतात. आणि तुमचे तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर रिफंडच्या वेळी तुमचे कुठलेही पैसे कमी नाही होत. हा नियम सामान्य तिकिटांना लागू होतो.
१ तास किंवा जास्त वेळ विमानाला उशीर झाल्यास जर तुम्ही तुमचे तिकीट रद्द केले तर तुम्हाला पूर्ण पैसे रिफंड मिळतात. तुम्ही जर ऑनलाईन तिकीट बुक केलेले असेल तर तुम्हाला हेल्पब्रिक्सच्या आयडीवर मेल करावा लागेल किंवा कदाचित ऑफिसमध्ये सुद्धा जावे लागू शकते.
कन्फर्म तिकीट असतानाही विमानातील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला विमानात बसण्यापासून रोखले तर तुम्ही विमानकंपनीकडून दंड घेऊ शकता. विमान रद्द झाल्यानंतर प्रवासाच्या तीन तास अगोदर एअरलाईन्सने प्रवाशांना सूचित नाही केले तर प्रवासी अशावेळी सुद्धा कंपनीकडून दंडाची मागणी करू शकतात. हा नियम त्या पॅसेंजर साठी लागू होत नाही ज्यांनी तिकीट बुकिंगच्या वेळी आपला मोबाईल नंबर दिलेला नाहीये.
फ्लाईट लेट झाल्यानंतर एअरलाईन्स प्रतीक्षावेळेत खाण्याच्या आणि नाश्त्याच्या व्यतिरिक्त गरजेनुसार हॉटेल आणि लोकल ट्रान्सपोर्टची सुद्धा व्यवस्था करते.
प्रवासादरम्यान तुमचे सामान हरवल्यास तुम्ही जिथे जात आहात तेथील एअरलाईन्सच्या बॅगेज डिपार्टमेंटशी तुम्ही संपर्क करू शकता. तिथे लेखी तक्रार द्यायला हवी. सर्व एरलाइन्स कंपन्यांना आपल्या वेबसाईटवर रिफंड आणि इतर सुविधांची माहिती पुरवणे बंधनकारक आहे. तसेच नोडल अधिकारी आणि अपिलीय अधिकाऱ्याची माहिती सुद्धा असायला हवी.
तिथे आलेल्या तक्रारींना युनिक रेफरन्स नंबर देणे गरजेचे असते. फ्लाईट रद्द झाल्यास तुमचे तिकीट आपोआप पुढच्या फ्लाईटसाठी शिफ्ट होईल. त्यादरम्यान तुमच्या थांबण्याचा, खाण्या-पिण्याची व्यवस्था एअरलाईन्स कंपनी करते.
जर तुमच्याकडे नाजूक सामान असेल तर आणि तुम्हाला ते लगेज म्हणून बुक करायचे नसेल तर तर तुम्ही तुमच्या बाजूच्या सीटवर लगेजसाठी बुक करू शकता. विमानात तुम्ही कुठलंही द्रव्य असलेलं सामान घेऊन जाऊ शकत नाहीत. जसे कि लायटर, कैची, फोम असलेली शेविंग क्रीम नेलकट, चाकू हे पण घेऊन जाणे गुन्हा आहे.
या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला विमानप्रवास करताना माहिती असणे आवश्यक आहे. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…