पॉर्न सिनेमा बघणे हे एक व्यसन आजकालच्या पिढीला जडले आहे. त्यामुळे अनेकदा लोक खऱ्या आयुष्यातील लैंगिक जीवनाची आणि पॉर्न सिनेमांची तुलना करतात. पण हि तुलना तुमच्या आनंदाला धक्का पोहचवू शकते. कारण सर्वानी हे लक्षात घ्यायला हवं की, शारीरिक संबंध ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्या वेगळ्या अनुभवासाठी वेगळ्या गोष्टीही कराव्या लागतात. पण पॉर्न सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी या एकरप्रकारे अतिरेक असतात. त्या गोष्टी खऱ्या आयुष्यात होत नसतात आणि करण्याचा प्रयत्नही करू नये.
काळानुसार सर्व काही बदलत चाललं आहे. आजकालच्या जीवनशैलीत अनेकदा लैंगिक समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भभवत आहेत. आणि त्यातली त्यात पॉर्न सिनेमे हे तर अतिरेकच करतात. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात समस्या निर्माण होत आहेत. कारण या सिनेमांमध्ये अशा काही लैंगिक क्रिया दाखवल्या जातात ज्या खऱ्या आयुष्यात शक्यच होऊ शकत नाहीत.
पण पॉर्न सिनेमे बघून अनेकजण या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि तसं काही करण्याचा प्रयत्न करुन ते शक्य नाही झाल्याने निराश होतात. त्यामुळे अशा गोष्टी टाळून तुम्ही स्वत:च्या लैंगिक जीवनावर लक्ष द्यायला हवं. पॉर्न बघून आनंद घेणे हि वेगळी बाब आहे आणि तीगोष्ट रोजच्या आयुष्यात करणे वेगळी. तास करण्याच्या नादात तुम्ही स्वतःच मात्र वाईट करून घ्याल.
खाली दिलेल्या या काही गोष्टी आहेत ज्या पॉर्न सिनेमा बघून तुम्ही खऱ्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करता-
अशक्य टेक्निक करण्याचा प्रयत्न करणे
पॉर्न सिनेमांमध्ये कलाकारांना वेगवेगळ्या विचित्र क्रिया करताना बघून तुम्ही त्या करण्याचा प्रयत्न करू शकता. पण त्यात ते केवळ तुमच्या मनोरंजनासाठी केलं जातं. हे तुम्ही खऱ्या आयुष्यात करण्याचा चुकूनही प्रयत्न करु नका. तुम्ही असा प्रयत्न केल्यास तुम्हाला आणि जोडीदारास आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
काल्पनिक बॉडी इमेज
पॉर्न सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची बॉडी हि फक्त तुम्हाला आकर्षित करण्यासाठी दाखवली जाते. पण खऱ्या आयुष्यात सर्वांचीच अशी बॉडी असू शकत नाही. त्यामुळे पॉर्न सिनेमांशी स्वतःचे आयुष्य तुलना करून अनेकांमध्ये न्यूनगंड येते. त्यामुळे या पॉर्न सिनेमांसोबत स्वत:ची तुलना करु नका.
सतत शारीरिक संबंधाची इच्छा
जर तुम्ही कधी पॉर्न सिनेमे पाहिले असतील तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की, त्यातील लोक हे सतत केवळ शारीरिक संबंधासाठी भुकेलेले दाखवले जातात. पण खऱ्या आयुष्यात तसं नसतं. त्यामुळे यावर विश्वास ठेवून तुम्ही स्वत:वरील विश्वास गमावून बसाल.
प्रत्येकवेळी परमोच्च आनंदाची आशा करणे
प्रत्येकवेळी महिलांना परमोच्च आनंद मिळेल असं वास्तवात शक्य नाहीये. परमोच्च आनंद हा तुमचा मूड आणि परिस्थितींवर निर्भर असतो. पण पॉर्न सिनेमांमध्ये दाखवले जाते की, कलाकार नेहमीच परमोच्च सूख मिळवतात. पण खऱ्या आयुष्यात प्रत्येकवेळी असं नसतं. त्यामुळे असं होत नसल्यानेही अनेकांना निराशा येऊ शकते. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे आपले आयुष्य या सिनेमांसोबत न जोडणे.
तासंतास चालणारी क्रिया
एक सामान्य शारीरिक संबंधाची क्रिया फोरप्ले वगळून ही सरासरी १५ मिनिटे असते. मात्र पॉर्न सिनेमांमध्ये ३०-३० मिनिटे ही क्रिया केल्याचे दाखवले जाते. त्यामुळे आपला समजही तसाच होतो. पॉर्न सिनेमांमध्ये दृश्ये वेगवेगळे शूट केले जातात आणि तेच दृश्य एकत्र करुन दाखवले जातात.
त्यामुळे तुम्हीही ३० मिनिटांची लैंगिक क्रिया का होत नाही? असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. असे करण्याचाही तुम्ही प्रयत्नही केला तर तुम्हाला महागात पडू शकतं. यामुळे तुमच्या सुखी आयुष्यात मानसिक त्रास झेलावा लागू शकतो.