मुंबईला जोडणारी लोकल हि जीवनदायिनी आहे आणि सर्व स्थानकांना वेगवेगळे नावे देण्यात आलेली आहे. परंतु या नावा मागचा इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे. तर आज खासरेवर बघूया मुंबई मधील स्टेशनच्या नावा मागचा इतिहास,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
ब्रिटनची राणी विक्टोरिया यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त विक्टोरिया टर्मिनस या इमारतीचे नाव बॉम्बे विक्टोरिया टर्मिनस हे ठेवण्यात आले होते. १९९६ मध्ये व्ही. टी. स्टेशनचे नामांतरण करून छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले आणि कालांतराने परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव ठेवण्यात आले.
भायखळा
भायखळा या ठिकाणी धान्याची खळे भरण्याची गोदाम होती. त्या गोदामच्या मालकाचे नाव भाया हे होते. भायाचे खळे म्हणजेच भायखळे आणि कालांतराने या भागास भायखळा म्हणून ओळखण्यात येऊ लागले.
करी रोड
स्वतंत्र पूर्व काळात रेल्वे रूळ देखभालीचे काम किंवा रेल्वे प्रशासन चालविण्याचे काम जीआयपी आणि बीबीसीआय अशा रेल्वे कंपन्याकडे देण्यात आले होते. या कंपन्याची जवाबदारी सी. करी यांच्या कडे होती. यांच्या नावावरून स्टेशनला करी रोड स्टेशन देण्यात आले.
कॉटन ग्रीन स्टेशन
१८ व्या शतकात फोर्ट किल्याचा भाग असलेले सेंट थोमस चर्च गर्द हिरव्या झाडाच्या परिसरात होते. या भागात असलेल्या बंदरामुळे इथे कापसाचे ढीग लागायचे. म्हणून या भागात उभारलेल्या स्टेशनला कॉटन ग्रीन स्टेशन हे नाव देण्यात आले.
चर्चगेट
सध्याच्या फ्लोरा फाऊनटन या भागात अगोदर चर्च होते. याच चर्चच्या नावावरून या भागात उभारण्यात आलेल्या स्टेशनला चर्चगेट हे नाव देण्यात आले.
ग्रँट रोड
ग्रँट रोड या भागात रस्ता बांधून तो थेट गिरगावला जोडण्याचे काम त्यावेळचे गवर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांना देण्यात आले होते. त्यांच्या नावावरून ग्रँट रोड स्टेशनला नाव देण्यात आले.
चर्णी रोड
गिरगाव भागात पहिले कुरण होते. त्यांना चरणहि म्हणायचे याच चरणीच्या जवळ १८६७ ला स्टेशन बांधण्यात आले. त्यामुळे या स्टेशनला चर्णी रोड स्टेशन हे नाव देण्यात आले.
परळ
परळ स्टेशन भागात भरपूर प्रमाणात परळीकी झाडे होती म्हणून या स्टेशनला परळ हे नाव देण्यात आले.
दादर
दादर मधून जाणार्या रेल्वे रूळामुळे जे दोन भाग निर्माण झाले त्यांना जोडण्यासाठी एक पूल बांधण्यात आला. या जिन्याला दादरा असे म्हणतात. त्यामुळे या स्टेशनचे नाव दादर असे ठेवण्यात आले.
विलेपार्ले
पोर्तुगीज भाषेत विले म्हणजे वसाहत आणि पावडे म्हणजे खेडे असा अर्थ होतो. कोळी लोकांच्या वसाहतीतस पोर्तुगीज “विले पावडे” असे म्हणत. लोकांनी केलेल्या शब्दाच्या अपभ्रंशा मुळे या भागाचे नाव विलेपार्ले हे ठेवण्यात आले.
घाटकोपर
घाटकोपर हा शब्द घाटा सोबत जुळलेला आहे. घाटाच्या वरती असलेले गाव म्हणजे घाटकोपर असे होते. लोकांनी केलेल्या शब्दाच्या अपभ्रशांमुळे या स्टेशनचे नाव घाटकोपर हे ठेवण्यात आले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..