हा सांता म्हणजे अंधश्रद्धा नाही तर सत्य आहे. येतो त्याची ती त्या ठराविक तालातली गाणी म्हणतो, आशिर्वाद देतो आणि जातो. हा सांता दुर्लक्षित राहिलाय पण अजूनही अस्तित्व टिकून आहे. आपल्याला आपल्या घराबाहेर हा सांता अजूनही अधूनमधून सकाळी दिसतो.
सांताक्लॉजला कोणी पाहिलंय ? तर कोणीच नाही, मग जर तोच नाहीये तर त्याची गिफ्ट्स तरी कुठून असणार ! पण हा आमचा मराठी किंवा देशी सांता डोळ्यांना दिसतो आणि आशिर्वादही देतो. सुखाचा संदेश देणारा हा आपला मराठी सांताक्लॉज म्हणजे वासुदेव. खासरेवर जाणून घेऊया सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव) विषयी रंजक माहिती…
कोण असतात वासुदेव?
वासुदेव हे एकप्रकारचे लोक कलाकार असतात. वासुदेव हे त्या कुळाला बोलले जाते जे विठ्ठल रुख्मिनी किंवा भगवान श्रीकृष्णच्या धार्मिक गोष्टी घरोघरी आणि मंदिरात जाऊन लोकांना सांगतात. वासुदेव हे कृष्णाची महिमा सांगणारे खरे पुरुष भक्त आहेत.
वासुदेव हे जास्तीत जास्त वेळा सणासुदीला दिसतात, विशेषकरून दिवाळी मध्ये वासुदेव आपल्या घरी येतात. कृष्ण वासुदेवाचे हे प्राचीन पंथ भारतात फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अजूनही महाराष्ट्रात वासुदेव खूप प्रचलीत आहेत.
या कुळातील प्रत्येक सदस्याला वासुदेवाचे रूप म्हणून ओळखलं जातं. वासुदेव हे संगीत वाद्यतंत्र चिपळ्या किंवा हातातील झांजीच्या तालावर भजन गीतांच गायन करतात. या सांस्कृतिक परंपरेला ग्रामीण भागात कुळाचे युवा वंशज पुढे नेत आहेत. ते समूहाने किंवा एक एक करून गावात आणि शहरात फिरतात. वासुदेवाचे गाणे विशेष ध्यान आकर्षित करतात कारण ते एकतर सामाजिक मुद्यावर किंवा समाज कल्याणसाठी संदेश देतात. ते आपल्या वेगळ्या शैलीत या मुद्यांना प्रदर्शित करतात.
वासुदेवाचा पेहराव त्यांच्या प्रदर्शनासारखाच आकर्षक असतो. ते विशिष्ट पांढरी-नारंगी धोतर घालतात आणि त्यांच्या कपाळावर आणि गालावर गुलाबी रंगाचा टिळा असतो. ते रुद्राक्ष माळा घालतात. त्यांच्या डोक्यावर मोर पंखाने सजलेली शंखाकार टोपी असते जी त्यांच्या पेहरवाच्या आकर्षणात अजून भर घालते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…