चोरी चोरी चुपके चुपके सिनेमाच्या सिनेमाचा फायनान्सर भारत शाहला अंडरवर्ल्डच्या माफियांची माहिती लपवण्याचा आरोपाखाली दोषी ठरवत न्यायालयाने १ वर्षाची शिक्षा सुनावली होती. सोबतच निर्माता नसीम रिजवी आणि त्याचा सहायक अब्दुल रहीम अल्लाबख़्श याला ६ वर्षाची शिक्षा ठोठावली होती.
त्यांनी चोरी चोरी चुपके चुपके या या सिनेमासाठी छोटा शकीलचा काळा पैसा वापरल्याचे सिद्ध झाले होते. तसेच या सिनेमाचा निर्माता नसीम रिजवी हा छोटा शकीलचा हस्तक असल्याचे सिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
या खटल्याचा संबंध थेट बॉलीवुडशी असल्याने हा खटला खुप गाजला होता. बॉलीवुड आणि अंडरवर्ल्ड चे लागेबांधे या खटल्यामुळे सर्वांसमोर आले होते. यापूर्वीही हे सर्वांनाच ठाऊक होते पण यावर भाष्य करण्याची कोणाची हिंमत नसायची.
भारत शाह हे एक इंडस्ट्री मधलं मोठं नाव होतं. बॉलीवुड मधला एक मोठा फायनांसर म्हणून परिचित असलेला भरत शाह पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने सर्वांची कुंडली एकप्रकारे बाहेर आली.
या खटल्यात बॉलीवुड मधील नामचीन अश्या 13 व्यक्तींनी साक्षी दिल्या होत्या. त्यात सलमान ख़ान, शाहरुख़ ख़ान, राकेश रोशन, महेश मांजरेकर, अली मोरानी, संजय गुप्ता, निर्माता हरीश सुघंद, रतन जैन आणि मोहम्मद मोरानी आदींचा समावेश होता.
भारत शाह खटल्याचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याने यातील सर्व च्या सर्व जणांनी आपली साक्ष कोर्टात फिरवली होती. त्यावेळी अख्ख्या बॉलीवुड मधून एकच रणरागिणी आपल्या साक्षीवर अटळ अडिग ठाम राहिली, ती म्हणजे प्रीटी झिंटा.
प्रीती झिंटाला २००० मध्ये चोरी चोरी चुपके चुपके सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अंडरवर्ल्ड कडून धमकी मिळाली होती. रज्जाक नावाच्या व्यक्तीने ५० लाखांसाठी तिला धमकी दिली होती. त्यावेळी निर्माता नजीम रिझवी ने चिंता नको करू असे तिला सांगितले होते.
प्रीती झिंटाचे महाराष्ट्राशी आहे असे नाते-
प्रीती झिंटावर दबाव असतानाही तो झुगारुन देत तिने आपली साक्ष बदलली नाही. प्रीती झिंटाच्या कुटुंबाचा इतिहास बघितला असता तिच्या शौर्याचे रहस्य त्यातून समोर आले आहे.
सन 1761 रोजी झालेल्या पानीपतच्या महासंग्रामानंतर अनेक मराठा कुटुंबे पानीपतच्या परिसरातच स्थायिक झाली. पानिपत, कुरुक्षेत्र, कर्नाल, जिंद या निवडक जिल्ह्यांत ती राहतात. अनेक पिढ्या उलटल्या तरी आपण मूळचे मराठी आहोत, याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही. त्यांची आडनावेही भोसले, चोपडे, झाकले, चौधरी, राणे, इंगोले अशी आहेत. कोल्हापूरचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वसंतराव मोरे यांच्या निरीक्षणानुसार, त्यांची संख्या तब्बल सात लाख आहे.
प्रिती झिंटाचे कुटुंब हे देखील यापैकीच एक असून ती मराठा वीरांगणा आहे. तसेच त्यांचे मुळ आडनाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील झांटे आहे. पानिपतच्या शूरवीरांचा वारसा अभिनेत्री प्रीती झिंटाला लाभलेला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…