भारतातील काही शाळा आपल्या कार्याने नेहमी वेगळा ठसा उमटवीतात. काही शाळा अधिकारी घडवितात आणि काही नेते असच काही “दुन स्कूल” विषयी आहे. भारतात हि शाळा नावाजलेली आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे १८वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सोबतच शिकणारे नवीन पटनाईक हे ओडीसाचे आणि कॅप्टन अमरिंदर हे पंजाब चे मुख्यमंत्री आहेत.
उत्तराखंड येथील देहरादूनच्या या शाळेचे नाव जगात नाव लौकिक आहे. १९६४ साली दून स्कूलमध्ये कमलनाथ हे शिकलेले आहे. विशेष म्हणजे त्यांची निवड ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या जागेवर झालेली आहे ते ज्योतिरादित्य देखील याच शाळेत शिकलेले आहेत.
१९८० साली राहुल गांधी देखील याच शाळेत शिकले होते ज्योतिरादित्य त्यांचा सोबतच याच शाळेत शिकले होते परंतु सुरक्षा कारणास्तव त्यांना या शाळेत काढून घरीच शिकविण्यात आले होते.
याच शाळेत भारताचे प्रधानमंत्री राजीव गांधी आणि त्यांचे भाऊ संजय गांधी देखील शिकलेले आहेत. म्हणजे या शाळेने देशाला प्रधानमंत्री देखील दिलेला आहे. कमलनाथ आणि संजय गांधी एका वर्गात शिकलेले आहेत. या शाळेमध्ये अनेक नावाजलेले चेहरे शिकलेले आहेत.जसे कॉंग्रेस लीडर मनीशंकर अय्यर हे १९५७च्या बैच चे ते विद्यार्थी आहेत. १९५९ सालच्या बैचचे विद्यार्थी माजी संरक्षण मंत्री अरुण सिंघ हे राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात होते.
कॅप्टन अमरिंदर आणि अरुण सिंघ हे सोबत शिकलेले आहेत. NDTV चे सह संस्थापक प्रनोय रॉय , जेष्ठ पत्रकार स्वामिनाथन अय्यर ,इंडिया टुडे ग्रुपचे मालक अरुण पुरी हे देखील याच शाळेत शिकलेले आहेत. या शाळेची संपूर्ण यादी लिहण्यास आपला लेख हि कमी पडेल यात काही शंका नाही.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
Source:- The Print