अनेकदा आपण व्हाट्सअपवर मित्रांना गंमतीमध्ये काही पण म्हणतो. मित्र मैत्रिणीसोबत गमती जमती व्हाट्सअपवर होत राहतात. पण असं मजेत एखाद्याला काही बोलल्यास त्याचा काही परिणाम भोगावा लागेल याचा कोणी स्वप्नातही विचार नाही करणार.
पण अबु धाबीमध्ये एका तरुणाला मजेत केलेला व्हॉट्सअॅपवरील मेसेज चांगलाच महागात पडला आहे. या तरुणांने आपल्या भावी पत्नीला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठविला. भावी पत्नी म्हणल्यावर तरुणाने मजेत एखादी गोष्ट बोलणे सामान्य आहे. पण हे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.
अबूधाबीच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या तरुणाने आपल्या पत्नीला मजेत मूर्ख म्हणले. पण त्याला कुठे ठाऊक होते कि हा मेसेज त्याला तुरुंगात पाठवेल. होय या तरुणाची या एका मेसेजने तुरुंगात रवानगी केली.
भावी पत्नीला त्याने मजेत हबला म्हणजेच मूर्ख म्हंटले तर पत्नीला त्यात तिचा अपमान वाटला. अपमानजनक शब्द वापरल्याचे सांगत तिने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. त्यामुळे या तरुणाला ६० दिवसांचा तुरुंगवास आणि ४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सोशल मीडियावर अपमान झाल्यास सायबर क्राईमचा गुन्हा होतो दाखल-
कायदेशीर सल्लागार हसन-अल-रियामी यांनी येथील स्थानिक न्यूज पेपर Emarat Al Youm ला दिलेल्या माहितीनुसार, सोशल मिडीयावर कोणताही व्यक्तीने अपमानजनक शब्दाचा वापर केल्यास, त्या व्यक्तीवर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करण्यात येतो.
अशाचप्रकारे जानेवारी महिन्यात एका ब्रिटिश नागरिकाला तुरुंगात जावे लागले होते. या ब्रिटिश व्यक्तीने दुबईतील एका कर डिलरला रागाची इमोजी पाठवली होती. त्याच्याविरुद्ध तक्रार केल्याने त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…