एकीकडे पूर्ण देशात आरोग्य सेवा खूप खराब झाल्या आहेत आणि सरकारी दवाखान्यात चांगली सेवा तर मिळतच नसताना दुसरीकडे एक डॉक्टर असा एक अवलिया होता जो फक्त 5 रुपये फिस घेऊन इलाज करायचा. चेन्नई मध्ये 1970 मध्ये आपल्या डॉक्टरीची प्रॅक्टिस सुरू करणारे डॉ. जयचंद्रन सुरुवातीला फक्त सुरुवातीला पेशंटकडून फक्त 2 रुपये घेत असत.
68 वर्षीय जयचंद्रन चेन्नईच्या वन्नरपट्टइ मध्ये राहायचे. आज त्यांचे वयाच्या 69 व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. त्यांचे जास्तीत जास्त पेशंट हे कचरा गोळा करणारे आणि तिहाडी मजूर असायचे. पैशाअभावी कोणाचा मृत्यू होऊ नये या हेतूने जयचंद्रन यांनी जवळपास 50 वर्षांपूर्वी कमी पैशात उपचार करण्यास सुरुवात केली.
आपल्या या महान कार्याविषयी ते नेहमी सांगायचे की, ‘माझ्या परिवारात कोणी शिकलेले नव्हते. माझे आई वडील शेतात मजुरी करत होते. एवढेच नव्हे तर गावात सुद्धा पूर्ण शिक्षण घेतलेले कोणीही नव्हते. मे एकमेव होतो जो महाविद्यालयात पास झालो. मी आमच्या गावात बघायचो की बरेच लोकं उपचारा अभावी मृत्यूमुखी पडत असत. त्या परिस्थितीने मला डॉक्टर होण्यास प्रेरित केले. मी डॉक्टर बनून अशा लोकांचे उपचार करू इच्छित होतो ज्यांच्याकडे पैसे नव्हते.’
जयचंद्रन यांनी 1971 मध्ये आपल्या सोबतचे डॉक्टर कंगवेल यांच्यासोबत मिळून एक क्लीनिक सुरू केलं होतं. त्यावेळी ते कोणत्याही पेशंट कडून पैसे घेत नव्हते. पण त्यांच्या एका मित्राने त्यांना पेशंटकडून 2 रुपये घेण्याचा सल्ला दिला. त्याच मित्राने जयचंद्रन यांना क्लीनिक सुरू करण्यास मदत केली होती.
त्या मित्राचे म्हणणे होते की मोफत उपचार केल्यास लोकांना त्याचे महत्व नाही वाटणार. यामुळे ते आपल्या पेशंटकडून नाममात्र पैसे घेऊ लागले.
जर कोणी पेशंट तेवढे पैसे देण्याच्या परिस्थितीत नसेल तर ते एक रुपयाही घेत नसत. गरिबांवर चांगले उपचार करताना त्यांना तर लोकही ओळखू लागले आणि ज्यांच्याकडे चांगले पैसे होते असे लोकही त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येऊ लागले.
त्यांना परिसरातील सर्वात चांगले डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. ते सर्व लोक जयचंद्रन यांना फिस म्हणून भरपूर पैसे देऊ करत पण ते घेण्यास ते नाकारत असत. ते त्यांना पैश्याऐवजी काही गोळ्या औषधे घेऊन येण्यास सांगत असत. या औषधींना ते गरीब आणि गरजूंच्या उपचारासाठी वापरत असत. मागच्या पाच दशकात जयचंद्रन यांनी एकाच परिवारातील पाच पिढीवर उपचार केले होते.
जयचंद्रन याना आपल्या डॉक्टरी पेशावर खूप प्रेम होते. ते सांगायचे की या पेशात आपण चांगल्या प्रकारे माणुसकीने इतरांची सेवा करू शकतो. ते सांगायचे की त्यांनी जे काही शिक्षण घेतले आहे त्याचे पैसे वसूल करायचे नाहीयेत. त्यांच्या दारावर आलेल्या पेशंटसोबत कधीच भेदभाव केला जात नव्हता. मग ते कोणत्याही जाती, धर्म किंवा संप्रदायाशी निगडित असेना, जयचंद्रन यांच्या नजरेत सर्व पेशंट एकसमान होते. ते सांगायचे की कोणाचे प्राण वाचवल्यानंतर जो आनंद मिळतो त्याची तुलना अन्य कोणत्याच गोष्टी सोबत केली जाऊ शकत नाही.
एकेकाळी गरिबीत अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या जयचंद्रन यांचे कुटुंब आता समृद्ध झाले होते. त्यांची पत्नी आणि तीन मुलं सुद्धा याच पेशात आहेत. हेच कारण असेल की त्यांना पैशाची गरज नाही वाटायची. त्यांची पत्नी आपल्या कमाईने घर सांभाळते. जयचंद्रन आपल्या सामर्थ्याला गरिबांच्या सेवेसाठी वापरले. ते वेळोवेळी आल्या आजूबाजूच्या परिसरात जाऊन गरिबांसाठी मेडिकल कॅम्प घ्यायचे. आतापर्यंत त्यांनी 3000 पेक्षा जास्त कॅम्प घेतले होते. या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ जयचंद्रन यांना भावपूर्ण श्रद्धांजली..