रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या ‘सेंट रेजिस’मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका आज सप्तशृंगी देवीचरणी ठेवली.
11 डिसेंबर 2017 रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता. आता 27 जानेवारीला ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
कोण आहे राज ठाकरेंची सुनबाई-
राज ठाकरेंची होणारी सुनबाई प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ संजय बोरुडे यांची मुलगी मिताली आहे. अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले आहे.
अमित आणि मिताली यांची मैत्री खूप जुनी आहे. आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय. मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करते. या दोघींनी मिळून जुडवा टू या चित्रपटासाठी काम केलंय. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.
अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले. तेथेच त्यांची ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आता लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांची खूप जुनी मैत्री असून मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात होणार आहे. अमित ठाकरे हे सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार आहे.
लग्नाची पत्रिका सप्तशृंगी देवीचरणी-
हि पत्रिका अतिशय सध्या स्वरुपात छापण्यात आलेली आहे आणि पत्रिकेवर पुष्पगुच्छ तसेच आहेर आणू नये अशी टीप देखील लिहण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या लग्नाकडे लक्ष लागून आहे. यात शंका नाही आहे. पत्रिका मराठीत छापण्यात आली आहे. साखरपुड्याची पत्रिका हि इंग्रजी मधून छापण्यात आली होती.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.