प्रमोद महाजन भाजपचे महत्त्वाचे राष्ट्रीय नेते होते. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपचे ते पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५मध्ये प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. स्वकर्तुत्वाने त्यांनी देशांच्या राजकारणात भावी पंतप्रधान म्हणून नाव कमावले होते. 2006 मध्ये प्रमोद महाजन यांची त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली आणि या देशाने एक मोठा नेता गमावला.
२२ एप्रिल रोजी २००६ रोजी प्रमोद महाजन यांच्यावर वरळीतील ‘पूर्णा’ इमारतीतील घरात त्यांचा भाऊ प्रवीणने तीन गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी प्रवीण यांना जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली होती. प्रवीण महाजन यांचेही २००९ मध्ये ब्रेन हॅमरेज मुळे निधन झाले होते.
पूनम महाजन यांनी जागवल्या आठवणी-
पूनम महाजन आणि पंकजा मुंडे या नुकत्याच ‘कलर्स मराठी’वरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी वडिलांच्या आठवणी सांगितल्या. ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी माझ्या घरी बाबा येणार होते. मीच त्यांना १० ते १५ मिनिटांनी या असे सांगितले. मी यासाठी आजही स्वत:ला दोषी मानते, असे पूनम म्हणाल्या.
पूनम पुढे म्हणाल्या, ‘त्या दिवशी मी उशिरा उठले होते आणि घरात साफसफाईसाठी कोणीही नव्हते. त्यामुळे वडिलांना १० ते १५ मिनिटांनी यायला सांगितले. ते माझ्या घरी आले असते तर कदाचित ती घटनाच घडली नसती’.
रुग्णालयात जाताना बोलले शेवटचे शब्द-
यावेळी पूनम महाजन यांना आठवणी सांगताना कंठ दाटून आला होता. त्यांनी सांगितले कि ‘रुग्णालयात जाताना बाबा मला म्हणाले की मी असा काय गुन्हा केला, का मलाच हे पाहावं लागतं, मी कोणालाही सुखी नाही ठेवू शकलो’.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…