मूर्ती लहान पण कीर्ती महान हि मन आपण नेहमी ऐकत आहोच. असच काही देहरादून येथील अधिकारी आरती डोगरा यांच्या विषयी आहे. गहलोत सरकारनी चाळीस IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये आरती डोगरा यांना मुख्य जवाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती सयुक्त सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. आरती या अगोदर अजमेर येथे कलेक्टर म्हणून कार्यरत होती. २००६च्या बैच मध्ये आरतीची नियुक्ती झालेली आहे. तिच्या प्रशासकीय निणर्यामुळे फक्त राजस्थान नाही तर संपूर्ण भारतात तिची प्रशंसा केली जाते.
स्वतः प्रधानमंत्री मोदीनि सुध्दा त्यांची प्रशंसा केलेली आहे. अजमेर , बिकानेत इत्यादी ठिकाणी चांगली कामगिरी त्यांनी पूर्ण केली आहे. त्यांनी केलेली काही चांगले काम खालील प्रमाणे आहेत. बिकानेरच्या कलेक्टर असताना ‘बंको बिकाणो’ त्यांचा हा उपक्रम अतिशय गाजला होता. उघड्यावर शौच्छास न जाण्या करिता त्यांनी चांगली जनजागृती केली. रोज सकाळी गावात अधिकारी जाऊन पाहणी करत असे. गावात झालेल्या शौछालयाची माहिती त्यांनी मोबाईल app द्वारे online केलेली आहे.
हि मोहीम १९५ ग्रामपंचायत मध्ये यशस्वी राहली त्यानंतर अनेक जिल्ह्यात हि मोहीम राबविण्यात आली. त्यांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांना प्रेरणा हि IAS मनीषा पवार कडून मिळाली आहे. लहान असताना त्यांना शारीरक उंची करिता अनेक ठिकाणी टोमणे मिळत असे. परंतु तिच्या आईने तिला नेहमी धैर्य देण्याचे काम केले आहे.
बिकानेरला आरती यांनी अनेक अनाथ मुले दत्तक घेतलेली आहेत. त्या सांगतात कि घरच्यांना लोक म्हणायचे एक बाळ अजून होऊ द्या पण त्यांनी नेहमी सांगितले कि आरतीच आमचा मुलगा आहे. तिच्या या संघर्षास खासरेचा सलाम..