माणूस आणि पाळीव प्राणी हे समीकरण नेहमीच चालत आलेले आहे. जेवढ प्रेम आपण त्यांना देणार ते सुध्दा आपल्याला तेवढेच प्रेम देणार हे नक्की आहे. कुत्र्याने मालकाचे अनेक द प्राण वाचविले हे आपणास माहिती आहे. परंतु आज आपण खासरे वर जरा वेगळी कथा बघूया.
ब्राझीलमधील एका बेघर व्यक्तीला काही कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो बेघर असल्याने त्याला जवळचे कोणी नाही असे रुग्णालय प्रशासनाला वाटले. आता तो एकटा आहे हा समज हॉस्पिटलवाल्यांचा लवकरच बाजूला झाला. व्यक्ती जिथे राहत होता त्याच्या सोबत अनेक कुत्रे राहत होती. तीच कुत्रे हॉस्पिटलच्या गेटवर घोळका करून उभे होती.
रुग्णालयाच्या दारात उभे असलेले हे कुत्रे बघून अनेकांना गहिवरून आलेले आहेत. मग रुग्णालयातील नर्सने या कुत्र्यांचा फोटो काढून तो फेसबुकवर पोस्ट केला. त्यामुळे लाखो लोकांचे हृदय हेलावून गेले. ही सगळी कुत्री आणि हा माणूस एकत्र राहत असल्याचे समजले. जो व्यक्ती दवाखान्यात होता तो यांना नेहमी खाण्यास देत होता आणि यांच्या सोबत राहत होता. त्याचाच प्रत्यय म्हणजे जेव्हा आपला सोबती रुग्णालयात आहे हे कळल्यावर या सर्व कुत्र्यांनी रुग्णालयाच्या दाराबाहेर एकच गर्दी केली होती.
नर्सने पोर्तुगिज भाषेत पोस्ट लिहून टाकलेल्या या फोटोला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केल्या जात आहे. काही दिवसातच ८० हजार लोकांनी फोटो पसंद केलेला आहे. आणि कमेंट मध्ये या कुत्र्यांची अनेकांनी स्तुती केलेली आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.