सामान्य शेतकरी कुटुंबात शरद पवार यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. एखाद्या मोठ्या शहरातही त्यांचा जन्म नाही झाला. पण, केवळ आपल्या दूरदृष्टीने, शांत, संयमी स्वभाव याच्या बळावर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचे नेते असलेले शरद पवार हे एका राष्ट्रीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
शरद पवारांना त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांची या प्रवासात मोलाची साथ मिळाली. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या लग्नाची गोष्ट मोठी रंजक आहे. खासरेवर बघूया कसे जुळले शरद पवारांचे लग्न..
1 ऑगस्ट 1967 या दिवशी बारामती येथे शरद पवार आणि प्रतिभा यांचा विवाह झाला. प्रतिभा या पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या आहेत. जेव्हा पवार साहेबांचे स्थळ आले तेव्हा सांगण्यात आले कि ‘एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बीकॉम झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे.’ परंतु मुलगा शिकलेला असूनही काहीच करत नाही म्हणत सदू शिंदे यांनी त्याना नापासच केले होते.
पण शरद पवारांचे मोठे भाऊ बाप्पुसाहेब यांचे मोठे नाव होते. आणि स्वत बापूसाहेबांनी लग्नाची बोलणी केली होती. सदू शिंदे यांनी शरद बापूसाहेबांचा धाकटा भाऊ असल्याने लगेच होकार कळवला.
पुण्यात मुलगा पाहण्याचा कार्यक्रम ठरला. शरदराव प्रतिभाताईंना पाहायला पुण्यात आले. त्यावेळी त्यांनी खादीचा जाडाभरडा गर्द गुलाबी बुशशर्ट आणि तसलीच पण हिरवीगार पँट घातली होती. प्रतीभाताईंच्या आजोबांनी एका नजरेत पवार साहेबांचा वक्तशीरपणा ओळखला आणि होकार दिला.
१ ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह बारामतीत झाला. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता. एवढा पाउस असतानाही लग्नाला सगळ्या पंचक्रोशीतील हजारो माणसे उपस्थित होती. शेवटी त्यांच्या आमदारांचा वाढदिवस होता.
शरद पवार आणि प्रतिभाताई यांना एक मुलगी आहे. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. त्यांनी सुद्धा राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शरद पवार आणि प्रतिभा ताई यांच्या सुखी संसाराला पाच दशके झाली आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…