आयपीएल साठी काल जयपूरमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली युवराजसिंग आणि वरून चक्रवर्ती या दोन खेळाडूंची. वरुण चक्रवर्ती या नवोदित खेळाडूवर किंग्स इलेव्हन पंजाबच्या मालकांनी तब्बल ८.४० कोटींची बोली लावली. २० लाख बेस प्राईज असलेल्या या खेळाडूला एवढी मोठी रक्कम देऊन खरेदी केल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्कास बसला.
वरूण चक्रवर्ती हे नाव आजपर्यंत खूप कमी लोकांनी ऐकले असले. खासरेवर बघूया भारतीयांना माहिती नसलेल्या या खेळाडूमध्ये असे काय खास आहे, ज्यामुळे लागली एवढी मोठी बोली.
कोण आहे वरुण चक्रवर्ती?
वरुण चक्रवर्ती हे नाव आजपर्यंत तुम्ही कदाचितच ऐकले असेल. तामिळनाडूचा असलेल्या वरून श्रीवास्तव १३ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. वरुणने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतर १७ व्या वर्षापर्यंत विकेटकिपिंग केली.
वरुणला त्याच्या एज ग्रुपमधून खेळण्याची संधीच मिळत नव्हती. त्यामुळे त्याला घरून देखील अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी व क्रिकेट खेळणे कमी करण्यास दबाव टाकला जाऊ लागला. वरुणने देखील मग क्रिकेटकडून अभ्यासाकडे लक्ष वळवलं. त्याने ५ वर्षाची आर्किटेक्टर ची डिग्री मिळवली. त्यानंतर तो आर्किटेक्ट म्हणून फ्रिलान्स नोकरी करायला लागला.
त्याने नोकरी करत करत क्रिकेट खेळणेही सुरु ठेवलं. तो टेनिस क्रिकेटचा शौकीन होता. त्याच नोकरीत मन रमलं नाही. त्याने नोकरी सोडली आणि पुन्हा क्रिकेट खेळण्याचे ठरवले. त्याने क्रिकेट क्लब जॉईंन केला आणि ऑलराऊंडर म्हणून खेळण्यास सुरुवात केली. वरुणने आपल्या गोलंदाजीत एवढे वेगवेगळे प्रकार शिकले कि तो थोड्याच दिवसात मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जाऊ लागला.
ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कैरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिनर आणि स्लाइ़डर या ७ प्रकारे तो गोलंदाजी करू शकतो. वरूण तामिळनाडू प्रीमियर लीगमधून चर्चेत आला. त्याने फायनल मॅचमध्ये १६ रन देऊन ३ विकेट घेतल्या होत्या. त्यावेळी कॉमेंट्री करताना ऑस्ट्रोलियाचा खेळाडू माईक हसीने वरूण मध्ये एक वेगळंच टॅलेंट असल्याचे सांगितले होते.
वरुणला विजय हजारे ट्रॉफी मध्ये तामिळनाडू कडून ५० ओव्हरच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने ९ मॅचमध्ये २२ विकेट घेतल्या. एक फेल क्रिकेटपटू ते आयपीएल मधील सर्वात महाग विकलेला क्रिकेटपटू बनला आहे.
वरुणच्या पुढील वाटचालीस खासरेच्या शुभेच्छा.