आठवले साहेब क्रांतिकारी जयभीम,माझं नाव प्रतिक गायकवाड मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा सदस्य नाही मी एक आंबेडकरी कार्यकर्ता आणि स्वतःला भारतीय म्हणणारा आहे.तुमच्यावरलील झालेल्या भ्याड हल्याचा मी निषेधच करीन,कारण की ही कृती असैविधानिक आणि विकृत आहे.
मला आठवतंय २००७ २००८ मी T-Series या या नामांकित कंपनीत As Editor म्हणून काम करत असताना २ वेळेस तुमचा शूट मी स्वतः केलाय. आनंद शिंदे,मिलिंद शिंदे यांच्या गाण्यांच्या अगोदर तुमचं मत आणि विचार तुम्ही मांडायचे आणि त्या वेळेस मी तुम्हाला भेटून प्रचंड आनंदित होतो.
मला आठवत की शूट चालू असताना “नास्ता” ब्रेक मध्ये “चहा” आला होता आणि कप टपरी वरच्या चहा वाल्या सारखा ग्लास होता आणि आमची धडपड सुरु होती आरे ग्लास तरी चांगला आणा म्हणून…त्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात आरे दे त्याच ग्लासात आणि तुम्ही चहा त्याच टपरीवरच्या चहाच्या ग्लासात पिलात. मनाला खूप बरं वाटलं होता की क्या बात हे हाच आपला तळागाळातील नेता…तेव्हा माझा वय साधारण १८ १९ वर्षाचा होतो.
कालांतराने जस जस वाचत शिकत गेलो तसं तसं सर्व गोष्टी कळायला लागल्या….मान्य आहे तुम्ही BJP सोबत गेलात तुमच्या म्हणण्या प्रमाणे समाज साठी गेलात पण खरंच सामाज्याला फायदा झालाय का? लोकांची अपेक्षा होती भिमाकोरेगाव नंतर तुम्ही आवाज उठवावा…सामाज्यातून निघणाऱ्या अनेक मोर्च्यात तुम्ही पाठिंबा द्यावा मग तो मोर्च्या कोणाचा ही असो पण तसं झाला नाही. कदाचित बीजेपी च्या दबाव म्हणा किंवा तुमचं मंत्रिपद काय कारणीभूत आहे हे तुम्हाला चांगलाच ठाऊक असेल आम्ही निष्कर्ष लावणं चुकीचंच ठरेल.
मी आज २८ वर्षाचा आहे. आज तुम्हाला भेटून ९ १० वर्ष उलटून गेलीत पण… जो पॅन्थर मी बघितला होता वाचला होता तो आज कुठे तरी हरवलाय किंवा सत्तेत बसून अडचणीत आल्याचं मला दिसून येतंय…एक वेळ अशी होती मी तुमचं फार मोठा चाहता होतो,आठवले साहेबांची सभा आहे चला जाऊया पण आज थोडी परिस्तिथी बदलले…आणि हो परिस्तिथी जरी बदलली असली तरी तुमच्या बदल मान सन्मान कुठे ही कमी झालेला नाही…पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेधच करतो
आठवले साहेब खूप लोकांना तुम्ही वर आणलात, ह्याचा अर्थ तो समाज नाही काही टाळकी आहेत. तेच तुमच्या बरोबर राहून गर्भ श्रीमंत झालेत मी नाव घेऊ शकतो पण ती वेळ नाही पण सामाज्याचा काय साहेब? आणि मला असं वाटत तुमच्या आजूबाजूला असलेली टाळकी हेच तुमचे घातकी आहेत कारण त्यांनी तुमचा वापर स्वतः साठी केलाय समाज साठी नाही…कधी तरी निरीक्षण करा तुमच्या जवळचे कॉन्टॅक्ट मधले कार्यकर्ते गर्भ श्रीमंत आहेत आणि झालेत ह्यात कोणतीही शंका नाही…”त्यात काही चांगले निष्ठावान कार्यकर्ते पण आहेत त्यात वाद नाही”…मला असा वाटत की आपण ह्याच चिंतन करावं.
आणि साहेब तुमचा एक वक्तव्य ऐकलं होता की “वाऱ्याची दिशा पाहून प्रवाह बदलला जाईल” पण एक काळ होता आठवले हे नावाचं एक वादळवारा होता आणि त्याच्या दिशे प्रमाणे लोक आणि नेते वाहत होते पण आज वेळ बदलले आज उलट झालाय…हे का झालंय असा प्रश पडत नाही का साहेब तुम्हाला?
आज भिमाकोरेगाव नंतर समाज एकवटलाय.त्याला राजकीय अस्तित्व वाढवायचं. एक भीमसैनिक म्हणून तुम्हाला माझी विनंती असेल लाथ मारा बीजेपी ला आणि पुन्हा एकदा होऊद्या तीच झंजावात, तुम्ही समजला असाल मी काय बोलतोय….मला माहिते बीजेपी मध्ये असताना तुम्ही जास्त त्यांच्या विरुद्ध प्रखर भूमिका घेऊ शकत नाही…पण आठवले साहेब “अभी नाही तो कभी नाही”
आणि हो “प्रवीण गोसावी” जो २०१७ परेंत तुमचाच कार्यकर्ता होता, मग त्यानेच तुम्हाला मारण्याची भूमिका का घेतली असावी ह्याची ही चिंतन गरजेचं आहे साहेब
आणि शेवटचं आज मला खूप आनंद ही झाला आणि दुःख ही सामाज्यातून तुमच्यावर गेल्या वर्षभरात सडकून टीका झाल्या पण…तुमच्यावर हल्ला झाल्यावर तीच लोक जे तुमच्या वर टीका करायचे आज जाहीर निषेध करतायेत, आपला समाज खूप भावनिक आहे पुन्हा एकदा राजकारण करून फुटी पडून आपण सामाज्याचा घात करण्या पेक्षा हाताची पाची बोटे एक होण्याची गरज वाटते…बाकी तुमची इच्छा.
माझ्या कडून काही चुकीचं बोललो असेल तर अगदी मनापासून माफी मागतो पण पॅन्थर च्या काळातले आठवले आम्हाला आता दिसत नाहीत हे एक कटू सत्य आहे साहेब…आणि तुमच्या बदल नेहमी मनात आदर भावनाच असेल.
आपला
प्रतिक गायकवाड
8108100379