भारतात सर्वात जास्त गाजलेले नाव विजय माल्या हे आहे. विजय माल्या प्रकाशझोतात येण्याकरिता अनेक कारण आहेत. तो खासदार होता, विमान कंपनी मालक, क्रिकेट टीम मालक आणि मुख्य म्हणजे त्याच्या भोवताल राहणारा मुलीचा गराडा होता. त्यानंतर विजय माल्या देशाला चुना लावून भुर्र उडून गेला आणि भारतीय बघत राहिले. आता त्याला भारतात परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
काही दिवसा अगोदरच विजय माल्याचा वाढदिवस झाला. परंतु माल्या विषयी हि माहिती गुगलवर नसल्याने ती शोधायला आम्हाला बराच वेळ लागला आहे. तर आज खासरेवर बघूया विजय मल्या विषयी काही मजेदार गोष्टी.
गोष्ट नंबर एक विजय मल्याला बँकेतील लोन देणारी मुलगी फोन नाही करत तर ते स्वतः लोन देणाऱ्या मुलीस फोन करतात. गोष्ट नंबर दोन विजय मल्या भारतातील एकमेव व्यक्ती आहे, जे बँकवाल्यांची वाट बघत नाहीतर बँकवाले त्यांची वात बघतात. गोष्ट नंबर तीन विजय माल्या एकमेव व्यक्ती आहे जे एखाद्यास न दारू पाजता बर्बाद करू शकतो.
गोष्ट नंबर चार विजय मल्या हे विना विमानाचे उडू शकतात. गोष्ट नंबर पाच विजय मल्या एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी सुब्रमण्यन स्वामी यांना चुना लावला आहे. गोष्ट नंबर सहा विजय मल्या एकमेव माणूस आहे जो न दारू पिता म्हणू शकतो कि ” आज तेरा भाई प्लेन उडायेगा”. गोष्ट नंबर सात इंग्रजांनी ७० वर्षात स्वतंत्रनंतर विजय मल्या हि पहिली भारतीय व्यक्ती आहे ज्यावर इंग्रजांनी ताबा ठेवला आहे.
गोष्ट नंबर आठ, गोष्ट नंबर नऊ… आणि सर्वात शेवटी गोष्ट नंबर दहा आपल्याला प्रश्न पडला असेल कि आठ आणि नऊ नंबर कुठे गेलेत परंतु विजय मल्या वरील दोन गोष्टीसुध्दा घेऊन पळून गेलेला आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..