देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची लेक ईशा अंबानी व आनंद पिरामल यांचे शाही विवाह सोहळा संपला आहे. लग्न होऊन चार दिवस झालेत पण या लग्नाची चर्चा अद्यापही संपलेली नाही.
एवढ्या मोठ्या माणसाच्या मुलीचं लग्न म्हंटल्यावर चर्चा तर होणारच ना. या लग्नात अनेक गोष्टी अशा होत्या ज्या भारतीयांसाठी थक्क करणाऱ्या आणि आश्चर्यकारक होत्या. त्यामध्ये बियॉन्सी या अमेरिकन सिंगर डान्सर ला या लग्नातर गाणे गाताना आणि नाचताना बघितले.
अंबानी कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान ‘अँटीलिया’ बंगल्यात अगदी थाटामाटात हे लग्न पार पडलं. या सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.
संपूर्ण हॉटेल भाड्याने घेणे असेल, खास पाहुण्यांसाठी चार्टर्ड विमानं असतील, शाही खाने असतील वा टॉपचे परफॉर्मन्स असतील यावरून लग्नाचा खर्च किती झाला याचा अंदाज बांधला जात होता. या लग्नासाठी ७२४ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सर्वत्र दाखवण्यात आले होते.
अंबानी कुटुंबाने 5100 गरीब लोकांसाठी अन्नछत्र ठेवले होते. चार दिवस ही अन्न सेवा सुरु होती. विवाहाच्या आधीच्या जयपूरमधील सोहळ्यावर व विवाहावर एकूण मिळून 724 कोटी रुपये खरोखर खर्च झाले का? हा प्रश्न अनेकांना होता.
मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खर्च झालेला आकडा हा फुगवून सांगण्यात येत आहे. लग्नासाठी खर्च झालेला खरा आकडा हा फक्त 100 कोटी झाला असल्याचे रिलायन्सच्या सूत्रांनी सांगिलते आहे.
अजय पिरामल यांनी आपल्या सुनबाई साठी हिंदुस्तान युनीलिव्हरकडून 452 कोटींचा बंगला खरेदी केला आहे. लग्नानंतर इशा अंबानी आणि आनंद पिरामल या 452 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहणार आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…