मनोहर अर्जुन सुर्वे, ऊर्फ मन्या सुर्वे हा एक 70 व 80 च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा. या मन्याला 11 जानेवारी, 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एनकाऊंटर होता.
तुम्हाला वाटेल मन्या सुर्वे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आला असेल पण तसे न्हवते तो एक सुशिक्षित व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला पदवी परीक्षेत ७८ टक्के गुण मिळाले होते. शाळा व महाविद्यालयीन काळात मन्या हा अतिशय साधा मुलगा होता. परंतु त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला व मन्या त्याच्या या स्वभावामुळे या क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती.
त्याचा एन्काउनटर तत्कालीन एसपी इसाक बागबान यांनी केला होता. इसाक बागबान हे मुळचे बारामतीचे आहे. मन्यामुळे मुंबई अंडरवर्ल्ड मधील जुने डॉन आणि पोलीस सर्वाकरिता तो डोकेदुखी झाला होता. सगळे त्याचा गेम करण्यामागे लागले होते परंतु मन्या अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना अतिशय कठीण चालले होते. माणूस प्रेमात हरतो व मन्यासोबत हि तशेच झाले मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रेयसीला फसविले आणि त्याला भेटायला बोलवून त्याचा एनकाऊन्टर केला.
मन्या सुर्वेचे पुणे शहराशी जबरदस्त नाते राहिले. मन्याचा जन्म 1944 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रनपूर येथे झाला होता. तो आपल्या आई व सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या लहानपणापासून खूप स्मार्ट होता. त्याला इंजिनियर बनायचे होते. मात्र, कॉलेजच्या काळातच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. तेथूनच त्याने पोलिसांचा बदला घेण्यासाठी एक गॅंग तयार केली. याद्वारे तो काळ्या धंद्याकडे वळाला.
मन्या सुर्वेने आपली पहिली हत्या १९६९ घडविली. त्यानंतर तो चर्चेत आला. दाउद मन्याच्या नावाने घाबरत असे. मन्या एकमेव असा डॉन आहे ज्याने दाउदला अनेक वेळेस मारून टाकायची धमकी दिली होती. मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे (मराठा) हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एन्काऊन्टर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची पलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती, असे सांगितले जाते.
आपल्याला हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..