मध्ये प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेससाठी हा ऐतिहासिक विजय होता. या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांच्या सोबतच जेष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना जाते. ज्योतिरादित्य सिंधिया हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण कमलनाथ यांनी यामध्ये बाजी मारली.
ज्योतिरादित्य सिंधिया हे प्रचंड लोकप्रिय नेते असून ते ग्वालियरच्या राजघराण्यातून येतात. खासरेवर जाणून घेउया त्यांच्या विषयी खास माहिती..
वडिलांच्या निधनानंतर झाले राजकारणात सक्रिय-
ज्योतिरादित्य सिंधिया हे एका राजघराण्यातून आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहेत. त्यामुळे लहानपणीपासूनच त्यांना राजकारण बघायला आणि शिकायला मिळाले. त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर ते सक्रिय राजकारणात आले. ३० डिसेंबर २००१ ला माधवराव यांचं एका विमान दुर्घटनेत निधन झालं. त्यानंतर फेब्रुवारी २००२ मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि लोकसभेत पोहचले. २००४ मध्ये ते पुन्हा निवडून आले.
हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड मधून झाले आहे शिक्षण-
ज्योतिरादित्य यांनी १९९३ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून इकॉनॉमीची डिग्री मिळवली आहे. पुढे त्यांनी २००१ मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कुल ऑफ बिझनेस मधून एमबीएची डिग्री पण मिळवली. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ४ वर्षे अमेरिकेत काम देखील केले.
शूटिंग आर्चरी आणि कार रेसिंग ची आहे त्यांना आवड-
ज्योतिरादित्य हे राहूल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. लोकसभेचे खासदार असलेल्या ज्योतिरादित्य यांना शूटिंग, आर्चरी आणि कार रेसिंगची आवड आहे.
पत्नी आहे जगातलं ५० सुंदर महिलांपैकी एक-
१ जानेवारी १९७१ ला जन्मलेल्या ज्योतिरादित्य यांची पत्नी देखील बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची राजकुमारी आहे. त्यांची पत्नी प्रियदर्शिनी यांनी जगातील ५० सर्वात सुंदर महिलांमध्ये देखील स्थान मिळवलेले आहे. ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शिनी यांना महाआर्यमान आणि अनन्यराजे हि २ मुलं आहेत.

४०० खोल्यांचा राजवाडा, ४० खोल्यात आहे म्युझियम-
केंद्रात जेव्हा मनमोहन सिंग यांचे सरकार होते तेव्हा २ वर्षे ज्योतिरादित्य हे केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत. राजकुमार असल्याने त्यांची संपत्ती आणि जीवनशैली स्वप्नवत आहे. ते ४०० खोल्यांच्या शाही राजवाड्यात राहतात. १८७४ मध्ये युरोपियन शैलीत या जयविलास पॅलेसची निर्मिती करण्यात आली होती. ४० खोल्या या म्युझियम असून सिलिंगला सोन्याचा मुलामा आहे.

दरबारात आहेत दोन भव्यदिव्य झुंबर-
जयविलास पॅलेसची भव्यता त्याचा दरबार बघूनच दिसून येते. या दरबारात १४० वर्षांपासून ३५०० किलोचे दोन झुंबर लावलेले आहेत. या झुंबरांची निर्मिती बेल्जीयमच्या कारागिरांनी केली होती. पॅलेसच्या डायनिंग हॉल मध्ये चांदीची रेल्वे आहे, जी जेवण वाढण्यासाठी वापरली जाते.
पण पॅलेस मध्ये मोठमोठे झुंबर लावल्याच्या अगोदर तो किती वजन झेलू शकतो हे बघण्यासाठी पॅलेसच्या छतावर चक्क हत्ती चढवले गेले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…