पहिल्या कसोटी सामन्यात रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर आज ऑस्ट्रोलियाविरुद्ध पर्थमध्ये दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रोलियने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात चहापानानंतर कोहलीने एक अप्रतिम झेल घेतला आहे. त्यामुळे चाहते कोहलीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला.
सामन्याच्या 56व्या षटकात ईशांत शर्माने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर हॅंडस्कॉंब सात धावांवर बाद झाला. कोहलीने स्लिपमध्ये स्पायडरमॅनसारखी हवेत उडी मारून उजव्या बाजूला झेपावत हा अफलातून झेल घेतला.
कोहलीने घेतलेला अप्रतिम झेल-
चाहत्यांच्या रिऍक्शन-
Loading...