२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून सुरु झालेली काँग्रेसची पराभवाची मालिका नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत थांबली. मध्ये प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. यापैकी राजस्थान मधील विजयात सचिन पायलट यांचा सिंहाचा वाटा होता. खासरेवर बघूया सचिन पायलट यांची प्यारवाली लव्हस्टोरी..
40 वर्षीय सचिन पायलट हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. सहारणपूर मध्ये जन्मलेले पायलट काँग्रेसचे नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. पंधराव्या लोकसभेतील मंत्रिमंडळात सचिन पायलट यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
सचिन पायलट यांचा 2004 साली जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मुलीसोबत विवाह झाला. पण या विवाहाची कहाणी रोमांचक आहे.
सचिन पायलट यांचे शिक्षण इयर फोर्स बाल भारती शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधील सेंट स्टीफन कॉलेजमधून बीएची डिग्री आणि गाजियाबाद मधील आयएमटी मधून डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. पेनसिल्व्हेनिया युनिव्हरसिटी मधून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले.
लंडनमध्ये झाले प्रेम-
तिथे शिक्षण घेत असताना त्यांची भेट सारा अब्दुल्लासोबत झाली. सारा हि जम्मूचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची मुलगी तर उमर अब्दुल्ला यांची बहीण आहे. तिथे दोघे सोबत शिक्षण घेत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली आणि पूढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केले.
पुढे सचिन हे भारतात परतले तर सारा तिथेच राहिली. तेव्हा ते दोघे एकमेकांना इमेल आणि फोनवर बोलायचे. पण जेव्हा त्यांनी आपल्या घरच्यांना प्रेमाविषयी सांगितले तेव्हा त्यांची खरी अग्निपरीक्षा सुरु झाली.
कारण सारा हि एका मुस्लिम कुटुंबातून होती तर सचिन हे हिंदू कुटुंबातून. दोघे पण राजकीय कुटुंबातून असूनही त्यांच्या प्रेमात धर्माचा अडथळा आला.
रात्रभर रडायची सारा-
साराला तेव्हा वाटायचं कि वडील तीच ऐकतील. पण जेव्हा ते या विषयावर बोलायचे देखील नाही तेव्हा सारा रात्ररात्रभर रडायची. सचिनला फारूक अब्दुल्ला आणि कुटुंबीय चांगले ओळखायचे आणि त्यांना पसंत देखील करायचे. पण राजकीय कारणांमुळे त्यांना हे लग्न करायचं नव्हतं.
अनेक महिने वाट बघूनही घरून काही परवानगी मिळाली नाही. तेव्हा त्यांनी कुठलीही पर्वा न करता २०१४ मध्ये लग्न केले. फारूक अब्दुल्ला यांच्या परिवारातील कोणीच सदस्य या लग्नाला उपस्थित नाही राहिला. त्यांनी अनेक वर्ष सचिन यांना जावाई म्हणून स्वीकारले नाही.
पुढे चालून त्यांनी या लग्नाचा स्वीकार केला. सचिन आणि सारा यांना आरान आणि विहान हि दोन मुलं आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…