उदयनराजे हे नेहमीच आपल्या आक्रमक शैलीतील बोलण्यामुळे चर्चेत असतात. उदयनराजे यांचा एक व्हिडिओ आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराज हे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतानाच हा व्हिडीओ आहे.
यामध्ये महाराज सुरुवातीला अधिकाऱ्याला समजावून सांगत आहेत कि जी कामे रखडली आहेत ती लवकर करून द्या. पण महाराजांनी त्या अधिकाऱ्याला आपल्या स्टाईलमध्ये दम देखील दिला.
जर कामं नाही केली तर अधिकाऱ्यांना चोपून काढा असे महाराजांनी नागरिकांना सांगितले. कामं करून दिली जात नाहीयेत म्हणून महाराजांकडे नागरिकांनी तक्रार केली होती.
बघा कशाप्रकारे महाराजांनी आपल्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांना ठणकावले..
Loading...