शेतकरी घरात जन्माला येऊन दौंड, पाटसच्या बाजारात भाजीपाला विकायला जावं लागतंय. वयाच्या विशीतच विद्यार्थी चळवळीत वाहून घ्यावं लागतंय. २७ व्या वर्षी आमदार व्हावं लागतंय आणि ३२ व्या वर्षी मंत्री. ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याची धमक असायला लागते. दुष्काळात शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना आणावी लागती. राज्यभर पायी फिरुन शेतकऱ्यांना भेटावं, बोलावं लागतं.
राज्याच्या कोणत्याही गावातल्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखावं लागतंय आणि रोज रात्री उशीरा झोपुन सकाळी ६ वाजता तयार व्हावं लागतंय. दिवसातले १६ ते १८ तास काम करावं लागतंय. एकाच मुलीवर स्वतःची नसबंदी करुन घ्यावी लागती आणि धुमधडाक्यात तिचं आंतरजातीय लग्न लावुन द्यावं लागतंय. इंदिरा गांधी, अटलबिहारी, विश्वनाथ प्रतापसिंग, नरसिंहराव, मनमोहनसिंग पासुन नरेंद्र मोदी पर्यंतच्या पंतप्रधानांनी वेळोवेळी मदतीसाठी बोलवावं लागतंय.
राज्याच्या कानाकोपऱ्यात सहकार, साखर, फळबागा, वीज, पाणी कसं पोहोचल हे बघावं लागतंय. पहाट ४ वाजता भुकंप झाल्यावर सकाळी ६ वाजता मातीच्या ढिगाऱ्यावर उभा राहुन मदत, पुनर्वसन सुरु करावं लागतंय.५१ व्या वर्षी संरक्षणमंत्री व्हावं लागतंय आणि सैन्यात महिलांना सामावुन घ्यावं लागतंय. सत्ता जाणार असल्याची माहिती असुनही ओबीसींना आरक्षण द्यावं लागतंय. महिलांना ५० टक्के सत्तेत आणि संपत्तीत वारसाही द्यावा लागतोय.
प्रस्थापित मराठ्यांची नाराजी घेऊन विद्यापीठाचं नामांतर करावं लागतंय. बीसीसीआय ते आयसीसीचे अध्यक्ष व्हावं लागतंय. दिल्लीत हुजरेगिरी न करता साठीत आल्यावर स्वतंत्र पक्ष काढायला लागतोय.एका रात्रीत ७० हजार कोटींची कर्जमाफी सोनिया-मनमोहन सिंगांच्या गळी उतरावी लागतीय. शेतमाल निर्यात हुईल अशी धोरणं आखावी लागत्यात.
देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी, दलित, मागास, अल्पसंख्याक या सगळ्या समाजाच्या हिताचा विचार करावा लागतोय.भुकंप झाला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, बॉम्बस्फोट झाला की जेवत्या ताटावरुन उठुन जावं लागतंय.पटो न पटो भाजप असो की सेना, डावे असोत की उजवे सगळ्या पक्षात मित्र पेरावे लागत्यात. आणि चुकीच्या प्रचाराला बळी पडलेल्या माथेफिरुची थप्पड खाऊन अव्यक्त असावं लागतंय.
ट्रकभर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही शांत असावं लागतंय. बिनबुडाचे आरोप करुन मोठं होणाऱ्यांना पण माफ करुन बरोबर घेण्यासाठी काळजात दिल असावं लागतंय.शरद पवारांवर टीका करणं सोप्प असतंय, पण शरद पवार होणं अवघड असतंय ! बघा जमलं तर तुम्ही पण शरद पवार व्हा !
राज्याच्या कानाकोपऱ्यात सहकार, साखर, फळबागा, वीज, पाणी कसं पोहोचल हे बघावं लागतंय. पहाट ४ वाजता भुकंप झाल्यावर सकाळी ६ वाजता मातीच्या ढिगाऱ्यावर उभा राहुन मदत, पुनर्वसन सुरु करावं लागतंय.५१ व्या वर्षी संरक्षणमंत्री व्हावं लागतंय आणि सैन्यात महिलांना सामावुन घ्यावं लागतंय. सत्ता जाणार असल्याची माहिती असुनही ओबीसींना आरक्षण द्यावं लागतंय. महिलांना ५० टक्के सत्तेत आणि संपत्तीत वारसाही द्यावा लागतोय. प्रस्थापित मराठ्यांची नाराजी घेऊन विद्यापीठाचं नामांतर करावं लागतंय.बीसीसीआय ते आयसीसीचे अध्यक्ष व्हावं लागतंय.
दिल्लीत हुजरेगिरी न करता साठीत आल्यावर स्वतंत्र पक्ष काढायला लागतोय.एका रात्रीत ७० हजार कोटींची कर्जमाफी सोनिया-मनमोहन सिंगांच्या गळी उतरावी लागतीय. शेतमाल निर्यात हुईल अशी धोरणं आखावी लागत्यात. देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी, दलित, मागास, अल्पसंख्याक या सगळ्या समाजाच्या हिताचा विचार करावा लागतोय.भुकंप झाला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, बॉम्बस्फोट झाला की जेवत्या ताटावरुन उठुन जावं लागतंय.
पटो न पटो भाजप असो की सेना, डावे असोत की उजवे सगळ्या पक्षात मित्र पेरावे लागत्यात. आणि चुकीच्या प्रचाराला बळी पडलेल्या माथेफिरुची थप्पड खाऊन अव्यक्त असावं लागतंय. ट्रकभर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही शांत असावं लागतंय. बिनबुडाचे आरोप करुन मोठं होणाऱ्यांना पण माफ करुन बरोबर घेण्यासाठी काळजात दिल असावं लागतंय.शरद पवारांवर टीका करणं सोप्प असतंय, पण शरद पवार होणं अवघड असतंय ! बघा जमलं तर तुम्ही पण शरद पवार व्हा !
लेखक – नवनाथ पोरे