एखाद्याच्या आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती ओढवते ज्यातून बाहेर पाडण्यासाठी सर्व मार्ग जवळपास अश्यकच असतात. पण अशक्य असणाऱ्या गोष्टीला या १६ वर्षाच्या मुस्कान ने शक्य करून करिष्मा करून दाखवला आहे. मुस्कान वर अशी वेळ आली होती जेव्हा डॉक्टरांनी ती फक्त १०० तासांसाठी जगेल असे सांगितले होते.
मुस्कानच्या जन्मापासुन तिच्या हृदयात छिद्र होते व तिचे फुफुस देखील पूर्णपणे विकसित झालेले नव्हते. तिच्या शरीराच्या काही भागांना अर्धांगवायू झाला होता. आणि इतरही काही समस्या होत्या. तेव्हा डॉक्टरांचे म्हणणे होते कि मुस्कान फक्त १०० जिवंत राहील.
पण आता मुस्कान १६ वर्षाची असून ती हजारो जणांसाठी प्रेरणा बनली आहे. मुस्कानने २ पुस्तकेही लिहिले आहेत. ती एक मोटिवेशनल स्पीकर असून तीचा रेडिओवर एक शो देखील होतो.
मुस्कान हि सामान्य दिसत असली आणि सामान्यपणे आयुष्य जगात असली तरी तिने आयुष्यात अनेक संकटाना तोंड दिले आहे. हेमिप्लेजिया या दुर्धर आजाराने मुस्कानला जन्मापासून ग्रासलं होतं. या बिमारीने शरीराचा अर्धा भाग पूर्णपणे काम करणे बंद करतो.
मुस्कानला फक्त अर्धांगवायूच नाही तर तिचे फुफुस देखील कमकुवत होते. तिची आई नेहमी सांगते कि मुस्कानचे हे १६ वर्ष आमच्यासाठी खूप खास राहिले आहेत. तिने मला सर्व काही दिले असून मी माझे जीवन तिला समर्पित करत असल्याचे त्या सांगतात.
मुस्कानचा जन्म अहमदाबाद मध्ये झाला होता. पण तिच्यावर उपचार भारतात शक्य नसल्याने तिला न्यूझीलंड मध्ये नेण्यात आले. तिथे शाळेत मुस्कानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शाळेत मुलं तिची मजाक उदवायचे. ती शाळेत एकटी एकटी राहायची. तिला पोहण्यापासून पण रोखले जायचे. पण आता मुस्कान पोहण्यात देखील तरबेज आहे.
मुस्कानला व्यायामासाठी एका मोटरसायकलची गरज होती. पण तिच्याकडे पैसे नसल्याने ती घेऊ शकत नव्हती. तेव्हा तिने एक पुस्तक लिहून पैसे जमा करून गाडी घेण्याचे ठरवले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने हे पुस्तक एक दिवसात लिहून काढले.
तिचे पहिले पुस्तक छापले तेव्हा ती अवघ्या ९ वर्षाची होती. तिचे पुस्तक चांगलेच प्रसिद्ध झाले आणि शिक्षण मंत्रालयाच्या जर्नल मध्ये देखील छापले गेले. एक सुप्रसिद्ध लेखिका असलेली मुस्कान न्यूझीलंड मध्ये एक रेडिओ शो देखील करते.
मुस्कानच्या प्रेरणादायी वाटचालीस खासरेच्या शुभेच्छा.