एक काळ असा होता की एखाद्या खेडेगावात एखादी महागडी कार जसे की फॉर्च्युनर वगैरे दिसली तर लोकं अक्षरशः कुतूहलाने त्या गाडीला बघायला जायचे. खेड्यातील एखाद्या व्यक्तीकडे अशी गाडी असणे म्हणजे पर्वणीच. पण सध्या मात्र हे सर्व बदलताना दिसत आहे. कारण अहमदनगर जिह्यातील एका गावाची ओळखच फॉर्च्युनर गाडीचे गाव अशी बनली आहे.
फॉर्च्युनरच्या सोबतीला गावात लाखालाखाच्या नव्या महागड्या गाड्या सुद्धा अनेकांनी खरेदी केल्या आहेत. जाणून घेऊया हे अहमदनगरचे एक खेडेगाव कसे बनले फॉर्च्युनरगाडीचे गाव.
हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील धोत्रे गाव. या गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की गावात चांगले रस्ते सुद्धा नाहीत. कच्चे आणि आबडधोबद रस्ते गावात जाताना आणि गावात सुद्धा आहेत. पण बहुचर्चित समृद्धी महामार्गाने या गावाला एक वेगळीच ओळख दिली आहे.
या गावातील लोकांची जीवनशैली एवढी बदलून गेली आहे की इथे गाड्या घेण्याची अक्षरशः चढाओढ लागली आहे.
समृद्धी महामार्गामुळे गावात एकापेक्षा महागड्या गाड्या धावू लागल्या आहेत. सध्या धोत्रे गावात 1-2 नव्हे तर तब्बल 114 बुलेट गाड्या खरेदीसाठी बुक झाल्या आहेत. गावातील अनेकांची बरीच जमीन महामार्गात गेली आहे.
गावातील बहुतांश समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या घरी फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या आणि मुलांना शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी नव्या कोऱ्या बाईक घेतल्या आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…