पुणे तिथे काय उणे या म्हणीचा प्रत्येय पुण्यात नेहमीच येतो. पुणेरी पाट्या तर सातासमुद्रापार परदेशातही प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात हल्ली पुणेरी होर्डिंग्स दिसायला लागले आहेत. ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होतेय. नुकतेच काही दिवसांपूर्वी पिंपरीतील ‘शिवडे आय अॅम सॉरी’ होर्डिंगचे प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची माफी मागण्यासाठी केलेला हा खटाटोप चर्चेचा विषय बनला होता.
यात भर म्हणजे याच आठवड्यात पुण्यात आता ‘दादा मी प्रेग्नेंट आहे’ असे होर्डिंग झळकले होते. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच कर्वेरोडच्या डेक्कन टी पॉईंटवर हे होर्डिंग लावण्यात आले होते. फक्त पुण्यातच नाही तर मुंबईतही हे होर्डिंग्स बघायला मिळाले. त्यामुळे या होर्डिंग्स विषयी प्रचंड उत्सुकता पुणेकरांच्या मनात निर्माण झाली होती.
सुरुवातीला हे होर्डिंग मुंबई पुणे मुंबई ३ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लावले असावेत अशी चर्चा सर्वत्र होती. पण नेमका उद्देश समोर येत नसल्याने संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडला होता की हे होर्डिंग कशाचे आहेत.
तुम्हीही अनेक तर्कवितर्क या होर्डिंग विषयी लढवले असतील. पण आता या होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं आहे. ही होर्डिंग्स एका नाटकाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आले आहेत. अन या होर्डिंगचा संबंध देखील एका मोठ्या अभिनेत्रीच्या गुड न्यूजशी आहे.
अभिनेत्री प्रिया बापट एक नवीन नाटक घेऊन आली आहे. ‘दादा, एक गोड न्यूज आहे’ असं या नाटकाचं नाव आहे. यामध्ये अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केल्यानंतर हे होर्डिंगचं रहस्य उलगडलं आहे.
उमेश आणि ऋता हे या नाटकात बहीण भावाचा रोल करणार आहेत. ऋता दुर्गुळेचे हे पहिलेच नाटक आहे. प्रीया बापटने अशाच स्वरूपाची एक पोस्ट केली होती. त्या पोस्टशी या होर्डिंगचा संबंध असल्याचं दिसतं.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…