आजच्या घडीला तुम्ही खाज सेकंदात कोणालाही पैसे पाठवू शकता. अगोदरच्या काळात हे शक्य नव्हते. त्यावेळी लोकांना पैसे खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. पैसे पाठवण्यासाठी मनी ऑर्डर करावी लागत असे. जे पोहचायला 5 ते 10 दिवस लागायचे. पण काळानुसार आता त्यामध्ये बदल झाले आहेत. आजच्या काळात कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण होते. बँकिंगशी निगडित असे अनेक अप्लिकेशन उपलब्ध आहेत जे डाउनलोड करून तुम्ही घरी बसल्या बसल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. या अँप मध्ये बँकेसोबत निगडीत काही माहिती जसे की अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकायची आवश्यकता असते. स्टेप्स पूर्ण केल्यानंतर काही वेळातच तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.
पण तुम्ही बघितलं असेल की लोकं ही सुविधा वेळेवर उपलब्ध नसल्याने चेकचा वापर करतात. बऱ्याचदा मोठ्या रकमेच्या पेमेंट साठी चेकचा वापर केला जातो. पण चेकच्या बाबतीत अनेक लोकांना काही गोष्टी माहिती नाहीयेत. त्यांना समजत नाही की चेक नंबर कुठे टाकायचा आहे आणि पैसे कुठे भरायचे आहेत.
तुम्ही कधी पाहिले असेल की चेकच्या खाली काही नंबर दिलेले असतात. पण क्वचितच कोणी या नंबरविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. बऱ्याच लोकांना माहिती नाहीये ली चेकच्या खाली ते नंबर का दिलेले असतात. या नंबरची संख्या 23 असते. आज आपण खासरेवर बघूया या 23 नंबरचा अर्थ काय असतो.
चेक नंबर-
खूप कमी लोकांना माहिती आहे की चेकच्या खाली दिलेल्या नंबर मधील पहिले 6 नंबर हे चेक नंबर असतात. कोणत्याही चेकच्या रेकॉर्ड तपासण्यासाठी या नंबरचे खूप महत्व असते.
MICR कोड-
6 अंकी चेक नंबर नंतर पुढचे 9 नंबर हे MICR कोड म्हणजेच Magnetic Ink Correcter Recognition बोलले जाते. या नंबरने तुम्ही जाणून घेऊ शकता ली चेक कोणत्या बँकेतून जारी करण्यात आला आहे. या अंकाना चेक रीडिंग मशिन वाचते आणि तीन भागात वेगळं करते.
MICR कोडमधील पहिले 3 नंबर हे आपल्या राज्याचा कोड सांगतात. या अंकावरून तुमच्या शहराचा शोध लागू शकतो. यानंतरचे 3 नंबर हे युनिक कोड असतात. सर्व बँकेचा स्वतःचा युनिक कोड असतो. शेवटचे 3 नंबर बँकेची शाखा दर्शवतात. बँकेच्या ब्रँच कोडशिवाय ट्रांजेक्शन पूर्ण होऊ शकत नाही.
अकाउंट नंबर-
चेक नंबर आणि MICR कोडनंतर पुढचे 6 अंक तुमचा अकाउंट नंबर दर्शवतात. म्हणजेच पहिले 6 अंक चेक नंबर नंतर 9 अंक हे MICR कोड आणि त्यानंतरचे 6 अंक हे अकाउंट नंबर दर्शवतात.
ट्रांजेक्शन आयडी-
नंतर शेवटचे 2 अंक हे ट्रांजेक्शन आयडी दर्शवतात. शेवटचे हे 2 अंक तुमच्या खाते क्रमांक दर्शवतात. जर तुमचा चेक हा लोकल असेल तर 9,10, 11 लिहिलेलं असेल आणि क्रॉस असेल तर 29,30, 31 लिहिलेलं असते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…