सुपरस्टार रजनीकांत यांचा सध्या २.० हा चित्रपट रिलीज होऊन मोठ्या प्रमाणावर चालतो आहे. २ दिवसातच या चित्रपटाने १०० कोटी रुपयाचा गल्ला जमवला आहे. यावरून रजनीकांतची क्रेज अजूनही टिकून आहे हे दिसून येते. रजनीकांत हे नीतिसंपन्न आणि आपल्या चाहत्यांची काळजी करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यासाठी त्यांनी करोडो रुपयांच्या ऑफर सुद्धा नाकारल्या आहेत.
रजनीकांत यांनी ४३ वर्षांच्या त्यांच्या फिल्मच्या करिअर मध्ये कधीच कोणत्याच ब्रँड ची त्यांनी जाहिरात नाही केली आहे. रजनीकांत यांच्या साठी वेगवेगळ्या ब्रँड नी विचारणा केलेली पण त्यांनी सर्वाना नकार दिला. भारतात कोला कंपनीने तर करोडो ची ऑफर रजनीकांत याना देऊ केली होती.पण त्यांनी कोलाच्या प्रतिनिधीला भेटावयाचे नाकारले होते. आपल्याला प्रश्न पडला असेल कि रजनीकांत का कोणत्याही ब्रँड ची जाहिरात करत नाही. त्यांना करोडो रुपये चालून आले तरी ते का नाकारतात.
रजनीकांत हे जाहिरात नाकारतात याला कारण त्यांचे काही नैतिक मूल्य आहेत. रजनीकांतच्या मते त्यांचे चाहते त्यांना देवासारखे मानतात. त्यांच्या गोष्टीचे अनुकरण करतात. रजनीकांत पैसे घेऊन एखाद्या वस्तूची जाहिरात करत असतील तर त्यांना वाटते कि त्यांच्या चाहते त्यांचे अनुकरण करून त्या वस्तू विकत घेतील. हा सरासर धोका रजनीकांत यांना वाटतो. तसेच साऊथ मध्ये रजनीकांत याना देवासारखे मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या देवाने कोक इत्यादी विकलेले त्यांना कसे वाटेल.त
असा विचार रजनीकांत करतात. आज ४३ वर्षात त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून शेकडो कोटीची कमाई केली असती.पण त्यांनी आपले नैतिक मूल्य जपले आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सुपरस्टार गुटखा पानतंबाखू दारू इत्यादीच्या जाहिराती करतात. पण रजनीकांत यांनी कोणत्याच ब्रँड ची जाहिरात केली नाही त्यामुळे आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांचे स्थान वेगळे टिकून आहे. काही वस्तू या ग्राहकांच्या फसवणूक करणाऱ्या असतात त्यांची जाहिरात करणे म्हणजे आपल्या चाहत्यांची फसवणूक आहे असे रजनीकांत याना वाटते.
जाहिरात घेत नाहीत मग त्यांची कमाई कशी होत असेल हा आपल्या मनात प्रश्न पडला असेल तर रजनीकांत हे देशात सर्वाधिक मानधन आकारणारे कलाकार आहेत. तसेच चित्रपटातील कमाई मध्ये हि त्यांचा शेअर निर्माता ठेवतो.शिवाजी द बॉस या चित्रपटाला त्यांनी २००७ मध्ये २६ कोटी रुपये मानधन घेतले होते आता २.० या चित्रपटासाठी त्यांनी ५८ ते ६० कोटी रुपये मानधन स्वीकारले आहे. फक्त चित्रपटाच्या माध्यमातूनच ते कमाई करतात.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.