मुकेश अंबानी हे भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती व सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर मुकेश हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखले जातात. मुकेश अंबानी हे नेहमीच आपल्या रॉयल लाईफमुळे आणि वेगवेगळ्या बिझनेसमुळे चर्चेत राहतात. नीता यांनी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्या आयपीएल आणि विविध सामाजिक कामांमुळे नेहमी चर्चेत असतात.
नेहमी लाईमलाईट मध्ये असणारे मुकेश आणि नीता अंबानी यांच्या विरुद्ध त्यांच्या मुलांचं आहे. ते नेहमी लाईमलाईट पासून दूर राहणे पसंत करतात. मोजक्याच वेळी कॅमेऱ्यासमोर ते नजरेस पडतात. नीता आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेणे भारतीयांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. त्यांच्या घराविषयी, गाड्यांविषयी जाणून घेणे भारतीय पसंत करतात.
अजून एक प्रश्न भारतीयांच्या मनात येतो, तो म्हणजे एवढे श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना पॉकेट मनी किती देत असतील. तुम्हाला माहिती आहे का मुकेश अंबानींच्या तीन मुलांचा(अनंत, आकाश आणि इशा) महिन्याचा पॉकेटमनी किती असेल? जेव्हा ते शाळेत जायचे तेव्हा त्यांना किती पॉकेटमनी मिळायला. याचं रहस्य खुद्द नीता अंबानी यांनी एका मुलाखतीदरम्यान खोलले होते.
Idiva ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीता अंबानी यांनी मुलांबाबत एम किस्सा सांगितला होता. नीता यांनी सांगितले की मुले जेव्हा शाळेत जायची तेव्हा त्यांना मी पॉकेटमनी म्हणून फक्त 5 रुपये द्यायची. यामागे खूप मोठं कारण असल्याचं त्यांनी सांगितले. मुकेश यांनी आपल्या वडिलांकडून कमी पैशात सर्व कसे मॅनेज करायचे याचे धडे घेतले होते.
मुकेश यांनी पैशाची बचत कशी करावी याची शिकवण धीरूभाई अंबानी यांच्याकडून घेतली होती. हीच शिकवण मुलांनाही द्यावी म्हणून ते प्रयत्न करत असत. मुकेश याना यामुळेच यश मिळाल्याचे नीता यांनी सांगितले. मुलांना लहानपणी आपण खूप श्रीमंत आहोत हे जाणवू द्यायचे नाही हा एक हेतू त्यांचा यामागे होता. नीता या त्यांना फक्त दर शुक्रवारी 5 रुपये द्यायच्या ज्याद्वारे मुलं कॅन्टीनमध्ये स्नॅक्स खात असत. इतर मुले मात्र त्यांना यावरून सारखं चिडवत असत.
आकाश, अनंत आणि इशाचे शिक्षण मुकेश नीता यांच्याच मालकीच्या शाळेत झाले. नीता यांची बहिन या शाळेत मुख्याध्यापिका असल्याने त्यांच्यावर नकळत विशेष लक्ष ठेवले गेले. नीता यांनीही मुलांवर वयक्तिक लक्ष ठेवून त्यांना चांगले संस्कार दिले.
अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलं कारने नव्हे तर चक्क पब्लिक ट्रान्सपोर्टने शाळेत जायचे. एव्हड्या मोठ्या जगातील दिगग्ज उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांची मुलं महागड्या कारने शाळेत जात असतील असे वाटणे साहजिक आहे पण याविपरित होतं. नीता अंबानी यासुद्धा त्यांच्या शाळा कॉलेजच्या जीवनात बेस्ट बसमधून जात असत. हेच संस्कार त्यांनी आपल्या मुलांमध्ये उतरवले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…