भारतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असे नेहमी लोक सांगतात परंतु ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-या प्रामाणिक अधिका-याच्या पाठीमागे उभे राहणारे फार कमी लोक आहे. अश्याच एका IAS अधिकाऱ्याची गोष्ट आपण आज खासरे वर बघुया. या अधिकाऱ्याने दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात त्याला २५ वर्षात ५१ ठिकाणी बदल्या मिळाल्या आहेत. या अधिकाऱ्याचे नाव आहे अशोक खेमका सध्या ते हरीयाणामध्ये खेळ व युवक कल्याण प्रमुख सचिव पदी होते. चला बघुया या प्रामाणिक अधिकाऱ्याची कथा खासरेवर…
मनोहरलाल खट्टर सरकारने यावर्षि १३ अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या यामध्ये अशोक खेमका हे ही नाव आहे. त्यांना हि गोष्ट नवीन किंवा आश्चर्य वाटणारी वाट नाही कारण या अगोदर त्यांची तब्बल ५० वेळेस विविध ठिकाणी बदली झाली आहे. कारण एकच त्यांची ज्या ठिकाणी बदली होते तिथला भ्रष्टाचार ते उघडकीस आनतात व या अधिकाऱ्यापुढे भ्रष्टाचारास थारा नाही.
बदली झाल्यावर त्यांनी एक भावनिक ट्विट सुध्दा केले की, ” खुप तयारी केली होती, परंतु अजुन एका बदलीची बातमी नुकतीच टेबल वर येऊन आदळली आहे. हे नेहमी सुरूच असणार परंतु माझ्या कामाला मि थांबविणार नाही.”
अशोक खेमका हे १९९१ सालच्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. २०१२ साली ते अचानक प्रकाशझोतात आले कारण होते त्यांनी रद्द केलेला जमिन व्यवहार समोरील व्यक्ती होता कॅाग्रेस अध्यक्ष सोनीया गांधी यांचे जवाई राबर्ट वाड्रा या प्रकरणानंतर अशोक खेमका यांची बदली भुसंपादन विभागातुन एकत्रीकरण विभागात करण्यात आली.
अशोक खेमका हे त्यांच्या प्रामाणिक स्वभावाकरीता प्रसिध्द आहे. त्यांचा स्वभाव हा सरळ आहे कितीही वेळ बदली झाली किंवा त्रास झालातरी चालेल परंतु अशोक खेमका त्याचा स्वभाव बदलवत नाही किंवा दबावाखाली येउन चुकिचे निर्णय घेत नाही. राज्य सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आनल्यानंतर अनेक वेळ त्यांना अज्ञात व्यक्तिकडुन जिवे मारण्याच्या धमक्यासुध्दा आल्या आहेत. परंतु हा अधिकारी अजिबात डगमगला नाही.
अशोक खेमका यांना २०११ साली भ्रष्टाचार विरोधी कार्याकरीता एसआर जिंदाल पुरस्कारसुध्दा मिळाला होता. हा सोहळा आयआयटी खरगपुर येथे झाला होता. काही ठिकाणी तर त्यांची बदली फक्त ४-५ दिवसात झाली आहे. त्याचा घरातील मुख्य खोलीत वेगवेगळ्या परदेशी वृत्तपत्राची कात्रणे फ्रेम केलेली आहेत ज्यामध्ये अशोक खेमका यांची आत्तापर्यतच्या कामाची दिशा कळेल. २०१३ साली ४३वी बदली झाल्यानंतर NDTV ने त्यांची मुलाखात घेतली होती त्यामध्ये ते सांगतात, “मि हरणारा नाही आहे. मि या सिस्टीमचा भाग आहे व नेहमी या सिस्टीमला चांगले करण्याकरीता काम करत राहील. मि एक अधिकारी म्हनुन माझे कर्तव्य पुर्ण करत आहे.”
वैयक्तिक आयुष्या विषयी सांगताना अशोक खेमका सांगतात, “मि रोज सकाळी पाच वाजता उठतो. रोज योगासने करणे हा माझा नित्यक्रम आहे. त्यानंतर दोन तास व्यायाम आणि एक तास बातम्या व पेपर वाचुन आपल्या कामाकरीता कार्यालयात जातो. संध्याकाळी रोज एलएलबीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतो. त्यानंतर घरी परत येऊन आई व पत्नीसोबत वेळ घालवतो” रिटायर झाल्यानंतर त्यांना वकीलीचा व्यवसाय सुरू करायचा आहे.
मुळचे मुलरूप कलकत्ता येथील असलेले अशोक खेमका यांनी आयआयटी खरगपुर व टाटा इंस्टीट्युट आॅफ फंडामेंटल रिसर्चमध्ये पदवीचा अभ्यास पुर्ण केला आहे. या प्रामाणिक अधिकाऱ्यास खासरेचा सलाम….
आपल्याला हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…