अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे नेहमीच चर्चेत असतात. रवी राणा हे अपक्ष म्हणून २ वेळा विधानसभेवर गेले आहेत. त्यांनी स्वतःचा भारत स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे. रवी राणा यांनी साऊथची सिनेअभिनेत्री नवनीत कौर यांच्यासोबत २०११ साली सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. त्यावेळी रवी राणा यांचे लग्न मोठा चर्चेचा विषय बनला होता. रवी राणा आणि नवनीत कौर यांची लव्हस्टोरी देखील तशी खास आहे. खासरेवर बघूया त्यांची लव्हस्टोरी..
रामदेव बाबांच्या आश्रमात झाले प्रेम-
रवी राणा यांना योगाची प्रचंड आवड आहे. ते रामदेव बाबांना मानतात. त्यामुळे त्यांचं नेहमीच शिबिराला जाणे व्हायचे. नवनीत कौर यांना देखील योगाची खूप आवड आहे. त्या पण रामदेव बाबांच्या शिष्य आहेत. रवी राणा आणि नवनीत कौर यांची भेट पाहिल्यांदा रामदेव बाबांच्या शिबिरात झाली होती. त्यानंतर रामदेव बाबांच्या परवानगीने पुढे लग्नाचा निर्णय घेतला.
सामूहिक विवाह सोहळ्यात झाले लग्न-
रवी राणा आणि नवनीत कौर यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ३१६२ जोडप्याचा विवाह झाला होता. या प्रचंड मोठ्या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा झाली होती. या विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू रामदेव बाबा, सहारा समूहाचे सुब्रतो रॉय, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्याच अनेक दिग्गज उपस्थित होते.
विवादात राहिल्या आहेत नवनीत कौर राणा-
३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत जन्मलेल्या नवनीत कौर राणा यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झालेला आहे. नवनीत कौर यांनी अनेक तेलगू चित्रपटात काम केले आहे. नवनीत कौर यांचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. त्या १२ वि पास झाल्यानंतर मॉडेलिंगकडे वळल्या. कौर यांनी मळयालम सहा पंजाबी चित्रपटात देखील काम केलेले आहे.
नवनीत कौर राणा यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली होती. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे आरोप झाले होते.
याशिवाय त्यांचे फोटो छेडछाड करून फेसबुक व्हाट्सअपवर व्हायरल झाले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर याचे आरोप करत पोलिसात तक्रार दिली होती. नवनीत कौर यांनी रवी राणा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर चित्रपटांना रामराम करत राजकीय मार्ग निवडला.
रवी राणा आणि नवनीत कौर यांच्या खास लव्हस्टोरीसाठी खासरे शुभेच्छा..माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…