तुला पाहते रे हि झी मराठी वरील सिरीयल टीआरपी बाबत महाराष्ट्रात अव्वल आहे. मोठ्याप्रमाणावर हि सिरीयल पाहिली जाते पण या सिरीयल बाबत तीव्र शब्दात आक्षेप घेण्यात आला व या सिरीयल वर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी पुणे मधील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर यांना निवेदन देऊन केली आहे. का आहे त्यांचा या मालिकेला विरोध हे अवश्य पुढे वाचा.
तुला पाहते रे या झी टीव्ही वरील मालिकेत 20 वर्षाची मुलगी 40 वर्ष युवकाच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे.
या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार रुजलेले आहेत.
या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला या मालिकेच्या माध्यमातून धक्का पोहोचवला जात आहे का ? असे आम्हाला भासत आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील 20 वर्षीय मुलीचे लग्न 40 वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यांनी याचे उत्तर द्यावे नाहीतर या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी.
असे निवेदनात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आपले म्हणणे मांडले आहे. तुला पाहते रे या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिकेत आहेत. सुबोध भावे विक्रांत सरंजामे तर गायत्री दातार ईशा निमकर नावाचं पात्र रंगवत आहे. दोघांच्या वयात खूपच अंतर आहे, मात्र वय विसरायला लावणारी प्रेमकहाणी या मालिकेतून दाखवण्यात येत आहे.
वयाने मोठा असलेला विक्रांत आणि त्याच्यापेक्षा निम्म्या वयाची ईशा हिच्या प्रेमात पडतो असे यात दाखवले आहे.
सध्या या मालिकेला प्रेक्षकाचा मोठा प्रतिसाद मिळतोय पण सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका काही चुकीची नाही त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले ते विचार करायला लावणारे आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…