प्रेम हे आंधळं असतं.. प्रेमाला वय-काळ-वेळ यांचे बंधन नसते. प्रेमाला कुठल्याच सीमा नसतात हे आजपर्यंत आपण अनेकदा ऐकलं आहे. काही असे उदाहरणं देखील बघतीले आहेत ज्यातून याचा प्रत्येय येतो. चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या लव्ह स्टोरीना तर कधी कधी सीमाच राहत नाहीत. पण चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या लव्हस्टोरी कधी कधी प्रत्येक्षात देखील बघायला मिळतात. अशीच काहीशी सध्या चर्चेत असलेली लव्हस्टोरी आहे अमेरिकन साराह कुहन आणि बांगलादेश येथे पेंटर असणारा मायकल अपू मोंडलची.
सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा आहे. चर्चा तर होणारच ! चर्चा होण्याचे कारणही तसेच आहे. साराह हि पेंटर असणाऱ्या अपू सोबत लग्न करण्यासाठी चक्क अमेरिकेतून बांगलादेश मध्ये पोहचली. अमेरिकेत नर्स असणारी साराह आणि मायकल अपू मोंडल यांची फेसबुकवरून मैत्री झाली. एका फेसबुकच्या ग्रुपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नापर्यंत येऊन पोहचले.
दोघांची फेसबुकवर ओळख झाल्यानंतर त्यांनी १ वर्षात भेटायचं आणि लग्न करायचं ठरवलं. दोघांच्या घरच्यांनी पण याला परवानगी दिली. सर्व काही सुरळीत चालू होतं. अपूने लग्नासाठी अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा साठी अर्ज केला. पण त्याला व्हिसा नाकारण्यात आला. मग साराह ने बरिसालला येण्याचा निर्णय घेतला आणि ती १९ नोव्हेंबर ला बरिसालला पोहचली. आणि २३ नोव्हेंबरला एंगेजमेंट देखील केली.
या आनंदाच्या क्षणाची पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. त्यांना शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांना ट्रोल केले. साराह ची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. साराह च्या पोस्टला फेसबुकवर जवळपास १५ हजार लोकांनी शेअर केले तर हजारोंच्या लाईक केले आहे.
पोस्ट वायरल झाल्यानंतर साराह ला हजारो फ्रेंड रिक्वेस्ट आणि मेसेजेस येत असल्याची पोस्ट तिने आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकली आहे. साराह आता अमेरिकेत जाऊन लग्नासाठी परवानगी घेणार आहे. साराहचा मूड बहुतेक तिथल्या परंपरा किंवा फेसबुक वरच्या त्रासाने चेंज झाला असावा.
साराह आणि अपू मोंडलच्या या खास लव्हस्टोरीला खासरेच्या शुभेच्छा.