दहा वर्षा अगोदर झालेला २६/११चा हल्ला झाला. ४ दिवस चाललेल्या ह्या थरारात १०० हून अधिक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाले. या हल्ल्यात आपल्या समोर अनेक हिरो समोर आले.
आपले अतुलनीय साहस दाखवत अनेक पोलीस कर्मचारी, सेना अधिकारी तसेच काही सामान्य नागरिक या हल्यामुळे प्रकाश झोतात आले. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी अनेकांचे जीव वाचवले.
परंतु या सर्व घटनामध्ये काही शूर चेहरे कधी समोर नाही आले किंवा ते पुढे आणण्या करिता मिडीयाने पाहिजे तेवढे प्रयत्न नाही केले.
या घटनेतील काही शूर न बोलू शकणारे चेहरे हे चार पायांचे श्वान होते. त्यांचे नाव मैक्स, टायगर, सुलतान आणि सीझर हे आहेत. मुंबई बॉम्ब शोधक पथकात हे चारही श्वान काम करत होते. या चार जनाच्या कामगिरी मुळे अनेक जीव वाचले. हे चारही एकमेकाना सोडून राहत नव्हते.
या गोष्टीवरून आपल्याला एक तर नक्की कळाले असेल कि प्रत्येक हिरो हा युनिफॉर्म घालून येत नाही. मैक्सचा जन्म २००४ साली झाला. पुणे येथे आपले ट्रेनिंग पूर्ण करून तो एका वर्षात बॉम्ब शोधत पथकात कार्यरत झाला. २६/११च्या हल्ल्यात मैक्सनि ८ किलो आरडीएक्स व २५ बॉम्बचा शोध लावला होता.
या शिवाय ७/११ व झवेरी बाजार येथील हल्ल्यात हि त्याने महत्वाची भूमिका बजावली. महानायक अमिताब बच्चन याच्या तर्फे त्याचा सत्कार देखील करण्यात आला होता.
सुलतान आणि टायगर हे दोघेही लहानपणापासून सोबत राहतात. २६/११ च्या हल्या वेळी त्यांची ड्युटी ताज हॉटेल मध्ये होती. गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये ते कार्यरत आहेत.
आणि सर्वात शेवटी सीजर हा नरीमन हाउस येथे कार्यरत होता. सोबतच त्याने CSTM स्टेशन वर ८ किलो आरडीएक्स व २ बॉम्ब शोधले. सीजर नि २००३ ते २०१५ साल पर्यंत बॉम्ब शोधक पथकात काम केले.
२०१५ साली चारही श्वान रिटायर झाले आणि त्यांना प्राणीप्रेमी विराज शाह यांनी दत्तक घेतलेले आहेत. विरार येथे इतर प्राण्यांसोबत ते राहतात. ८ एप्रिल २०१६ला मैक्सचा मृत्यू झाला. त्याला तिरंग्यात सलामी देण्यात आली. १८ जून २०१७ ला सुलतानचा मृत्यू झाला. त्यानंतर २२ जुलैला टायगरचा मृत्यू झाला.
सर्व मित्राचे मृत्यू झाल्याने सीजरचा देखील १३ ऑक्टोंबरला हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.या सर्वाना जवळ जवळच दफन करण्यात आलेले आहे. सध्या ते या जगात नी पण आम्ही खासरे मिडिया त्यांनि केलेल्या या अतुलनीय कार्यास कधीही विसरणार नाहीत.
आपल्याला हा लेख आवडला असेल किंवा नसेल परंतु या चार बहादुरांना जगासमोर आणण्याकरिता नक्की हा लेख शेअर करा.